no images were found
एचडीएफसी बँके तर्फे त्यांच्या कर्मचार्यांसाठी फ्रॉड अवेअरनेस सेशनचे आयोजन
मुंबई – एचडीएफसी बँके तर्फे त्यांच्या सिक्युअर बँकिंग अवेअरनेस ड्राईव्हचा एक भाग म्हणून व्हर्च्युअल फ्रॉड अवेअरनेस सेशनचे आयोजन करण्यात आले होते. या सेशनच्या माध्यमातून कर्मचार्यांना कशा प्रकारे फसवणूकीच्या योजना आखतात आणि त्याच बरोबर कर्मचार्यांना कशा प्रकारे यापासून बचाव करावा याबाबत माहिती देण्यात आली.
रिटेल क्रेडिट स्ट्रॅटेजी ॲन्ड कंट्रोल चे ग्रुप हेड श्री सुंदरेशन एम आणि एचडीएफसी बँकेचे क्रेडिट इंटेलिजन्स ॲन्ड कंट्रोल चे व्हाईस प्रेसिडेंट श्री मनीष अगरवाल यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि त्याच बरोबर त्यांनी काही केसेसची माहिती दिली. या उपक्रमात त्यांनी खोटी अकाऊंट्स उघडणे, पैसे वाईट हेतूने मिळवण्यासाठी बँकिंग चॅनल्सचा वापर करणे, दहशतवाद्यांचे फंडिंग, सायबर गुन्हे आणि पैसे फिरवण्याचे कार्य अशा सर्व कायदेशीर आणि नाव खराब करणार्या गोष्टींचीही माहिती दिली.
या अवेअरनेस सेशन मध्ये महाराष्ट्राचे माजी डीजीपी आणि मुंबईचे पोलिस कमिशनर आयपीएस, (निवृत्त) डॉ. डी. शिवानंदन यांचे प्रमुख भाषण झाले. या वेळी शिवानंदन यांनी सायबर गुन्हेगार कशा प्रकारे गुन्हे करतात ती पध्दत आणि सतर्क राहण्यासाठी कोणते उपाय करावे याविषयी माहिती त्यांच्या अनुभवानुसार दिली. त्यांनी कशा प्रकारे तुम्हाला भिती, आकर्षण आणि राग वाढवून निष्पाप नागरिकांना कसे फसवतात याची उदाहरणे ही दिली.
यावेळी बोलतांना श्री. सुंदरेशन एम यांनी सांगितले “ आजमितीस आपण अधिक प्रमाणात डिजिटल व्यवहार करत असतो. म्हणूनच गुन्हेगारांच्या गुन्हेगारीच्या पध्दतीची माहिती आपल्याला असणे आवश्यक असते आणि त्याच बरोबर सुरक्षित बँकिंग प्रणालींची माहिती करुन घेणे आवश्यक असते ज्यामुळे आपण ऑनलाईन गुन्ह्यांचे बळी पडणार नाही. हे अतिशय आवश्यक आहे की आपण कोणत्याही अविश्वसनीय लिंक वर क्लिक करु नये किंवा अनोळखी व्यक्तीला अगदी खाजगी बँकिंगविषयी माहिती देऊ नये.”
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये एचडीएफसी बँकेने संपूर्ण भारतात अशा प्रकारच्या १६ हजार कार्यक्रमांचे आयोजन केले असून यामध्ये समाजातील विविध स्तरांवरील २ लाखांहून अधिक लोकांनी भाग घेतला आहे. अशा कार्यशाळांच्या माध्यमातून शाळकरी मुले, कॉलेजेस, कायदेशीर अंमलबजावणी करणार्या संस्था, वरिष्ठ नागरिक, स्वयंसहायता ग्रुप्स, शैक्षणिक संस्था, विक्रेते, भागीदार आणि कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
बँके तर्फे ग्राहकांना सातत्याने सजग राहून डिजिटल बँकिंग सुविधांचा वापर करतांना सुरक्षित बँकिंग सुविधांचा वापर करत कोणालाही त्यांची वैयक्तिक माहिती देऊ नये अशी विनंती करण्यात येत आहे. जर ग्राहक चुकून अशा ऑनलाईन गुन्ह्याचे बळी ठरले तर त्यांनी लगेच अनधिकृत व्यवहाराची माहिती बँकेला कळवावी आणि भविष्यातील नुकसान रोखण्यासाठी पेमेंट मोड ब्लॉक करावा. ग्राहक आता गृहमंत्रालया (एमएचए) चा हेल्पलाईन नंबर १९३० वर कॉल करुन तक्रार करु शकतात तसेच नॅशनल सायबरक्राईम रिपोर्टिंग पोर्टल असलेल्या https://cybercrime.gov.in. या ठिकाणी तक्रार करु शकतील.