no images were found
महापालिकेच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांची जयंती साजरी
कोल्हापूर :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुर्वण जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने लक्ष्मी विलास पॅलेस (कसबा बावडा) येथील जन्मस्थळातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस, दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांचे पुर्णाकृती पुतळयास, सिध्दार्थनगर येथील नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळी व कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहातील राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांचे अर्धपुतळयास प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी कोल्हापूर जिल्हाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, श्रीमती जयश्री जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. डी.टी.शिर्के, अप्पर पेालिस अधिक्षक जयश्री देसाई, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उप-आयुक्त् साधना पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, प्रशासनाधिकारी शंकर यादव, उपशहरनचनाकार एन.एस.पाटील, उप-शहर अभियंता सतिश फप्पे, रमेश कांबळे, आर.के.पाटील, नगरसचिव सुनिल बिद्रे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे, अतिक्रमण विभाग प्रमुख विलास साळोखे, परवाना अधिक्षक राम काटकर, रवका अधिकारी प्रशांत पंडत, उद्यान अधिक्षक डॉ. विजय पाटील, शाहू प्रेमी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त 150 झाडांचे वृक्षारोपण
महापालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुर्वण जयंतीनिमित्त टेंबलाईवाडी व इतर ठिकाणी विविध प्रजातीच्या 150 झाडांचे उद्यान विभागाच्यावतीने वृक्षारोण करण्यात आले. यामध्ये वड, पिंपळ, गारुळ, गुळभेंडी, सावर, कडूलिंब यांचा समावेश आहे. यावेळी उद्यान अधिक्षक डॉ. विजय पाटील व उद्यान विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.