no images were found
जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसमोर 457 कोटींचा स्ट्रॉम वॉटरचा आराखडा सादर
कोल्हापूर : शहरातील स्ट्रॉम वॉटर मॅनेजमेंटसाठी 457 कोटींचा आराखडा तयार केला आहे. मंगळवारी हा आराखडा जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसमोर सादर करण्यात आला. हे सादरीकरण महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात दुपारी करण्यात आले. यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी, जागतिक बँकेचे प्रतिनिधी जोलांटा क्रिस्पिन वॉटसन, अनुप कारनाथ, शीना अरोरा, जर्क गॅल, विजया शेकर, मित्राचे निखिल पंगम, अतिरिक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे अरोरा, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, एन.एस.पाटील, उपशहर अभियंता रमेश कांबळे, आर के पाटील, महादेव फुलारी, सतीश फप्पे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, कन्सलटंट अजय ओक व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हयामध्ये येणाऱ्या महापूराच्या उपाययोजनेसाठी जागतिक बँकेकडून निधी दिला जाणार आहे. यामध्ये पूरबाधीत क्षेत्रातील कामांसाठी हा निधी मिळणार आहे. महापूराच्या कालावधीत स्ट्रॉम वॉटर मॅनेजमेंटसाठी 457 कोटी लागणार आहेत. हा निधी जागतिक बँकेकडून मिळावा अशी मागणी आजच्या बैठकीत करण्यात आली. याचे स्लाईड शोद्वारे सादरीकरणही यावेळी करण्यात आले. या व्यतिरिक्त महापालिकेचे हॉस्पीटल, पूर बाधीत क्षेत्रातील रस्ते व इतर पायाभूत सुविधेसाठीही जागतिक बँकेकडे निधीची मागणी प्रशासकांनी यावेळी केली. यावेळी पाणी पुरवठयासाठी व इतर पायाभूत सुविधेसाठी समितीच्या प्रतिनिधींनी सकारात्मकता दर्शवली आहे. हि समिती आठ दिवस अभ्यास करुन यानंतर त्यांचा अहवाल जागतिक बँकेस सादर करणार आहे.
सकाळी समिती सदस्यांनी ताराराणी फायर स्टेशन येथे भेट देऊन महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या यंत्र सामग्रीची पाहणी केली. सायंकाळी 4 वाजता समिती सदस्यांनी जयंती नाला, विंग्स हॉस्पीटल येथील नाला, पंचगंगा नदी घाट, रिलायन्स मॉल, सुतार वाडा या ठिकाणी पूर बाधीत क्षेत्राची पाहणी केली.