
no images were found
मध्यवर्ती बस स्थानक परिसरात महिलांसाठी स्वच्छता गृह
कोल्हापूर : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत मध्यवर्ती बस स्थानक परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या महिला स्वच्छता गृह आजपासून सुरु करण्यात आले आहे. महापालिका प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या आदेशाने शहरामध्ये मुख्य वर्दळीच्या ठिकाणी महिलांची गैरसोय होऊ नये यासाठी अद्यावत स्वच्छतागृह बांधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत शहरात विविध ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्यात येत आहेत. त्याचबरोबर शहरामध्ये विविध ठिकाणी महिलांसाठी स्वच्छता गृहांची दुरुस्तीही करण्यात येत आहे. शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात महिला स्वच्छता गृहाचे काम पूर्ण झालेने आजपासून ते स्वच्छतागृह महिलांना वापरासाठी खुले करण्यात आले आहे. या स्वच्छता गृहासाठी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती मधून 4 लाख 85 हजार 162 इतका खर्च करण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील वीर ककय्या विद्यालय, डॉ.झाकीर हुसेन उर्दू मराठी विद्यालय, ताराबाई पार्क उद्यान, नागाळा पार्क या ठिकाणी महिला स्वच्छता गृहे बांधण्यात येत आहे.