Home मनोरंजन इवासकडून ‘घर धडकने दो’ मोहीमेचा शुभारंभ

इवासकडून ‘घर धडकने दो’ मोहीमेचा शुभारंभ

16 second read
0
0
21

no images were found

इवासकडून ‘घर धडकने दो’ मोहीमेचा शुभारंभ

 :    भारतातील अग्रगण्य बांधकाम साहित्य कंपनी असलेल्या इन्फ्रा.मार्केट ने (Infra.Market) तिच्या डायरेक्ट-टू-कस्टमर या डीटूसी अंतर्गतच्या ब्रँड इवासद्वारे “घर धडकने दो” ही अनोखी मोहीम सुरू केल्याची घोषणा केली आहे.

गृहिणी आणि त्यांचे निवासस्थान यांच्यातील सखोल संबंधाशी अतिशय नजीकतेने जोडली गेलेली ही मोहीम आपली घरे आपल्याप्रमाणेच श्वास घेतात आणि जगतात, ही भावना साजरी करत आहे. आपल्या प्रिय कुटुंबातील सदस्यांची जशी आपण काळजी घेतो, तसेच त्यांना निष्ठा देतो, तशाच काळजीने आणि निष्ठेने आपल्या घरांचे आकर्षक करण्याच्या उद्देशाने ही संकल्पना मोहिमेत साकारण्यात आलेली आहे.

गृहिणी आपल्या आयुष्यातील बहुतांश वेळ हा आपल्या निवासस्थानी व्यथित करताना घरातील कानाकोपऱ्यात आराम आणि सहवास शोधत असतात, या संकल्पनेला इवास बळकटी देते. आपुलकीने भरलेल्या अंतःकरणाने, त्या घराला त्यांचे मूल, कुटुंबातील सदस्य किंवा मित्रत्वाच्या भावनेने जपत असतात. जसे आपण सर्वजण विशेष प्रसंगांसाठी स्वत:ला तयार करतो, त्याचप्रमाणे इवास आपल्या घरांच्या शोभेला आणि संवर्धनाला, आकर्षकतेला प्रोत्साहन देते. एकप्रकारे आपल्या घराबद्दल आपल्या असलेल्या भावनिक गुंतवणुकीप्रणाचे इवासही एकप्रकारे भावना प्रकट करत आहे, गृहिणींना सशक्त बनवतात इवास घरांच्या नूतनीकरणासाठी लागणाऱ्या उत्पादनांची संपूर्ण श्रेणी सादर करत आहे. ही संपूर्ण श्रेणी आराम, सौंदर्य आणि कार्यक्षमता वाढविणाऱ्या घरांच्या निर्मितीला प्रोत्साहन देते, घरांमध्ये जिवंतपणा फुलवते. इवासच्या या सर्व कृतीमागील एकच कारण म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमचे घर आवडते तेव्हा ते तुमच्यावर प्रेम करते.

प्रत्येक गृहिणीमध्ये ही भावना जागृत करण्यासाठी इवासने प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि जेनेलिया देशमुख यांच्याशी हातमिळवणी केली आहे. ही अनोखी  भागीदारी आपल्या घरांना कुटुंबातील एक अनिवार्य सदस्य या नात्याने  स्वीकारण्याच्या मुद्दावर जोर देते.

‘घर धडकने दो’, या मोहिमेच्या मुख्य संदेशावर भर देताना इन्फ्रा.मार्केट मार्केटचे सह-संस्थापक आदित्य शारदा म्हणाले, “घर ही कल्पना केवळ एक भौतिक जग नसून एखाद्याच्या ओळखीचे ते प्रतिबिंब असते, यावर आमचा विश्वास आहे. आमची मोहीम लोकांचे त्यांच्या घरांशी बांधले गेलेले भावनिक संबंध साजरे करते. त्यांच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी इवास त्यांचाकरिता एक विश्वासू सहकारी कसा असू शकतो, हे यातून प्रकट होते.”

रुपेरी पडद्यावरील आपल्या आकर्षक सादरीकरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिल्पा शेट्टी कुंद्राने या मोहिमेबद्दल तिची उत्सुकता व्यक्त केली, “घर बांधणे हा एक सखोल वैयक्तिक अनुभव असतो. एक हाऊस प्राऊड व्यक्ती म्हणून मी चांगल्या प्रकारे तयार केलेल्या आखीवरेखीव घराचे महत्त्व जानते. मला विश्वास आहे की इवास ब्रँडची उत्पादने ही प्रामुख्याने शैली आणि कार्यक्षमतेचे परिपूर्ण मिश्रण सादर करत असल्याने  गृहिणींना त्यांच्या स्वप्नातील घर सहजपणे तयार करता येते. तर मग आपल्या घरांबद्दलचे प्रेम आपण एकत्र साजरे करूया.” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आपल्या उत्साही आणि महत्त्वाकांक्षी व्यक्तिमत्त्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या जेनेलिया देशमुखने तिचा भावना अशाच छान शब्दांत व्यक्त केल्या आहेत. “घर हे माणसाची स्वप्ने आणि आकांक्षा प्रतिबिंबित करते. तरुण गृहिणींच्या इच्छा आणि आव्हाने इवास उत्तम प्रकारे जाणते. इवासची नाविन्यपूर्ण उत्पादने गृहिणींना त्यांची घरे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंबात रुपांतरित करण्यास सक्षम करत असल्याने ही प्रक्रिया आनंददायक ठरली आहे, परंतु त्याचबरोबर तिला एखाद्या बक्षीसासारखीसुध्दा भासत आहे. जेव्हा तुमचे घर आनंदी असते तेव्हा ते तुमच्या व्यक्तिमत्त्वात प्रतिबिंबित होत असते.” या शब्दांत तिने इवासच्या उत्पादनांचे वैशिष्ट स्पष्ट केले आहे.

‘घर धडकने दो’ मोहिमेच्या मुख्य संकल्पनेचा गाभा ग्राहकांच्या अनुभरुपी प्रवासातून पुढे आला असून तो त्यांना एक अद्वितीय घर साकारण्यास अनुमती देतो. इवास या एकाच ब्रँड अंतर्गत टाइल्स, बाथ फिटिंग्ज, सॅनिटरी वेअर, फॅन्स (Fans) , लाइटिंग, विविध उपकरणे, मॉड्युलर किचन आणि वॉर्डरोब्स, डिझायनर हार्डवेअर आणि बरेच काही स्टायलिश उत्पादनांची विस्तृत श्रेणी प्रदान करते. घराच्या बांधकाम आणि नूतनीकरणाच्या विश्वात या उत्पादनांनी क्रांती केली आहे.

बीबीएच या अग्रगण्य जागतिक क्रिएटिव्ह एजन्सीद्वारे आणि पब्लिसिस ग्रुपमध्ये तयार केलेली ही मोहीम, गृहिणींच्या जीवनात घराची भूमिका अधोरेखित करते. ही मोहिम आपल्या घरांचे कुटूंबातील सदस्याप्रमाणे पालनपोषण आणि काळजी घेण्याचे सार समाविष्ट करते आणि त्यामुळे आपल्या जीवनात त्याचे खरे महत्त्व प्रकट झाले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…