Home शासकीय  नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी प्रवेशासाठी मुदतवाढ

 नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी प्रवेशासाठी मुदतवाढ

10 second read
0
0
30

no images were found

 नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी प्रवेशासाठी मुदतवाढ

 

     कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व 8 वी साठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्जासाठी दिनांक 1 जुलै 2024 (रात्री 11.59 वाजेपर्यंत) मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय, पुण्याच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

 ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे –

सोमवार, दिनांक 1 जुलै 2024 रोजी (रात्री 11.59 वाजेपर्यंत) विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरणे. मंगळवार, दिनांक 5 जुलै 2024 रोजी विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करणे व सोमवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करणे याप्रमाणे आहे.

 उपरोक्त तक्त्यात नमूद कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 वी व 8 वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in हे संकेतस्थळ पहावे. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याप्रमाणे अर्ज भरण्यास सुरुवात करावी, असेही पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…