
no images were found
भाबींना प्रभावित करणे तिवारी व विभुतीला पडले भारी!
एण्ड टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये मनमोहन तिवारी (रोहिताश्व गौड) आणि विभुती नारायण मिश्रा (आसिफ शेख) त्यांच्या भाबी अनुक्रमे अनिता (विदिशा श्रीवास्तव) व अंगूरी (शुभांगी अत्रे) यांना प्रभावित करण्यासाठी कोणतीच कसर सोडत नाही. त्यांची कृत्ये अनेकदा त्यांना विनोदी स्थितींमध्ये अडकवतात, पण यावेळी भाबींना प्रभावित करण्याच्या त्यांच्या अद्भुत प्रयत्नांमधून विनोदी घटना निर्माण होतात. रोमांचक व मनोरंजनपूर्ण एपिसोडबाबत सांगताना विभुती नारायण मिश्रा (आसिफ शेख) म्हणाले, ”तिवारी अनिताला विशिष्ट वृत्ती असण्यासोबत काहीसे गर्विष्ठ असलेल्या लोकांबाबत तिची आवड व्यक्त करताना ऐकतो. दरम्यान, विभुती अंगूरीला विनम्र व व्यावहारिक असलेल्या पुरूषांची प्रशंसा करताना ऐकतो. त्यांचे मन जिंकण्याचा निर्धार केलेले तिवारी व विभुती भाबींना प्रभावित करण्यासाठी या वृत्तींप्रमाणे वागण्यास सुरूवात करतात. अनिताचा आदर्श व्यक्ती बनण्याच्या प्रयत्नात तिवारी सरकारी अधिकाऱ्याचा अपमान व अनादर करतो. ज्यामुळे, संतप्त अधिकारी त्याचा व्यवसाय बंद करून घरावर छापा टाकण्याची धमकी देतो आणि तिवारी मोठ्या संकटात सापडतो. तो त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी तिवारीला अनितासोबत डिनर डेटचे आयोजन करण्यास भाग पाडतो, ज्यामुळे तिवारी तणावग्रस्त होतो.” रोहिताश्व गौड (मनमोहन तिवारी) म्हणाले, ”तसेच, विभुती अंगूरीसाठी विनम्र व व्यावहारिक व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करत असताना एका भिकाऱ्याचे त्याच्याकडे लक्ष जाते आणि तो विभुतीला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात करतो. भिकारी विभुतीकडे मागणी करतो की अंगूरीने त्याला खायला दिले पाहिजे, अन्यथा तो तिला विभुतीच्या खऱ्या हेतूंबाबत सांगेल. या विलक्षण स्थितींमध्ये अडकलेले तिवारी व विभुती या दोघांनी यामधून मार्ग काढला पाहिजे.”
प्रेक्षक भाबींना तिवारी व विभुतीच्या खोट्या वर्तणूकीमागील सत्य कशाप्रकारे समजते हे जाणून घेण्यास आणि हास्याने भरलेल्या मनोरंजनपूर्ण आठवड्याचा आनंद घेण्यास उत्सुक असतील.