no images were found
‘वंशज’च्या सेट्सवर चाहत्यांनी माहिर आणि अंजलीला त्यांचे पोर्ट्रेट देऊन खुश केले
सोनी सबवरील ‘वंशज’ ही मालिका महाजन कुटुंबातील संघर्षाचे चित्रण करते. हा संघर्ष मुख्यतः वडीलोपार्जित वारशाच्या संकेतांमधून जन्मला आहे. युविका (अंजली तत्रारी) या मलिकेची नायिका आहे. महाजन साम्राज्याचे नेतृत्व मिळवण्यासाठी तिचा संघर्ष तिचा चुलत भाऊ डीजे म्हणजे दिग्विजय महाजन (माहिर पांधी)शी सुरू आहे.
देशभरातील कलाकारांचे चाहते बऱ्याचदा आपल्या प्रिय कलाकाराला भेटण्यासाठी सेटवर येत असतात. माहिर आणि अंजलीचे चाहते जेव्हा त्यांना अशा प्रकारे भेटायला आले, तेव्हा त्यांना एक सुखद धक्का बसला! हे तरुण चाहते फक्त आपल्या लाडक्या अभिनेत्यांना भेटायला आले नाहीत, तर त्यांनी स्वतः काढलेली त्या अभिनेत्यांची पोर्ट्रेट या दोघांना भेट म्हणून दिली! ही मंडळी जरा दबकतच सेटवर आली, पण माहिर आणि अंजलीने त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांना जे पोर्ट्रेट भेट देण्यात आले, त्यातून कलाकारांनी घेतलेली मेहनत स्पष्ट दिसत होती. आपल्या चाहत्यांच्या या कृतीने भारावलेल्या माहिर आणि अंजलीने आपल्या चाहत्यांशी गप्पागोष्टी करण्यात, त्यांना स्वाक्षरी देण्यात आणि सेल्फी काढण्यात सकाळ व्यतीत केली!
दिग्विजय महाजनची भूमिका करणारा माहिर पांधी म्हणाला, “आमचे चाहते या सेटवर आम्हाला भेटायला आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहून फार छान वाटले. त्यांनी माझ्या व्यक्तिरेखेचे चित्र काढावे ही गोष्ट मला फार हृद्य वाटली. डीजे खलनायक असूनही लोक त्याच्यावर इतकं प्रेम करतात हे पाहताना आश्चर्य वाटते. सोशल मीडियावर मला नेहमी फॅन आर्ट्स मिळत असतात, पण हाताने बनवलेले स्केच प्रत्यक्ष बघताना मी भावुक झालो. आम्ही करत असलेल्या कामाचा प्रभाव किती सुदूर पोहोचतो, याची प्रचिती त्या क्षणाने दिली. मला या गोष्टीचीही प्रकर्षाने जाणीव झाली की, आम्ही आमच्या व्यक्तिरेखेवर जी मेहनत घेतो ती केवळ पडद्यापुरती राहात नाही, तर आपल्याला कल्पना करता येणार नाही इतक्या वेगवेगळ्या प्रकारे ती लोकांना स्पर्श करते. अशा अनुभवांमुळेच हा प्रवास सार्थक होतो!”
युविका महाजनची भूमिका साकारणारी अंजली तत्रारी म्हणाली, “सेटवर मला आणि माहिरला भेटायला आलेल्या चाहत्यांच्या चेहऱ्यावरील चमक पाहताना खूप छान वाटले. आमच्या चाहत्यांनी आम्हाला सांगितले की, उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या आजी-आजोबांच्या घरी राहायला न जाता त्यांनी आमच्या व्यक्तिरेखांची चित्रे काढता यावी म्हणून चित्रकलेची शिकवणी केली होती. अभिनेता म्हणून ही गोष्ट आम्हाला खूप प्रोत्साहक वाटली. मला अभिनयाचे वेड होते, म्हणून मला पहिल्यापासून अभिनेत्री बनायचे होते.पण सर्व वयोगटांतील अनोळखी लोकांचे असे निःस्वार्थ प्रेम आणि आशीर्वाद मिळणे फारच प्रेरणादायक आहे. जेव्हा असे काही घडते तेव्हा मनात येते की, एखाद्या भूमिकेसाठी तुम्ही जे कष्ट घेतलेत, त्याचे चीज झाले! हे क्षण माझ्यासाठी फार मोलाचे आहेत!”