no images were found
तंत्रज्ञान अधिविभागातील “ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन ” शाखेतील ५४ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांनमध्ये निवड
कोल्हापूर (प्रतिनिधि): अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिवाजी विदयापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागामध्ये विविध शाखांसाठी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले जाते. या माध्यमातून २०२३-२०२४ या वर्षी अधिविभागातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन शाखेतील ५४ विद्यार्थ्यांची निवड नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमधे झालेली आहे. विभागातील इतर शाखामधून देखील अनेक विद्यार्थ्यांची राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमधे निवड होत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक व अभिनंदन विभागाकडून केले जात आहे.
या निवडप्रक्रियेत एच.पी . एंटरप्राइजेस ( ५ विद्यार्थी – पॅकेज ४. २ लाख) , एलकॉम मरीन मुंबई 3 – विद्यार्थी – 3. ५ लाख) , सायबर सक्सेस ( 3 विद्यार्थी – २ ते ४ लाख), एलकॉम इंटरनॅशनल ( ४ विद्यार्थी – 3 लाख), इन यंत्रा ( 3४ विद्यार्थी – २ लाख) , क्वालिटी किओस्क (२ विद्यार्थी – ४ लाख ), किंग लाईफस्टाईल (१ विद्यार्थी – ३.८ लाख ), टेक्नॉलॉजीज बेंगलोर (१ विद्यार्थी – २ लाख) , बीव्हीजी ग्रुप (१ विद्यार्थी – ३.८ लाख ) असे यश लाभले आहे.
तंत्रज्ञान अधिविभागाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के सर, प्र.कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील सर व कुलसचिव डॉ. व्ही. एन शिंदे सर यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक प्रा. डॉ. एस. एन. सपली, शिवाजी विद्यापीठ प्रशिक्षण व प्लेसमेंट सेल अधिकारी डॉ. राजन पडवळ, तंत्रज्ञान विभागाचे प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा. गणेश पाटील, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन समन्वयक प्रा. डॉ. एस. बी.चव्हाण व त्यांचे सहकारी प्राध्यापक, प्लेसमेंट प्रतिनिधी प्रा. अमर डुम , प्रा. प्रविण सावंत यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात वी .एल. एस.आय सेंटर ऑफ एक्सलन्स आहे . तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू आहे . त्यामध्ये ॲडव्हान्स कम्युनिकेशन , कॉम्प्युटर
नेटवर्किंग, वी.एल. एस.आय, एम्बेडेड सिस्टिम्स हे स्पेशलायझेशन तर सायबर सिक्युरिटी, डाटा सायन्स , आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग , आय.ओ.टी या आंतरशाखीय अभ्यासक्रमांचा अंतर्भाव केला आहे . देशांतर्गत चीप मॅन्युफॅक्चरिंग तसेच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला उत्तेजन देण्याचे काम शासन पातळीवर सुरू आहे.
फाईव्ह जी ,सिक्स जी अशा बदलामुळे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधील विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे या शाखेतील विद्यार्थ्यांचे करिअर उत्तम असेल असे प्रतिपादन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन समन्वयक प्रा. डॉ. एस. बी.चव्हाण यांनी केले.