
no images were found
ऐश्वर्या खरे आणि रोहित सुचांति झळकले दक्षिण भारतीय विवाह पोशाखांमध्ये
झी टीव्हीवरील सर्वांची लाडकी मालिका ‘भाग्यलक्ष्मी’च्या आगामी भागांमध्ये चाहत्यांच्या आवडत्या व्यक्तिरेखा लक्ष्मी (ऐश्वर्या खरे) आणि रिषी (रोहित सुचांति) हे आपल्या आकर्षक नवीन लूकसह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतील. कथानकानुसार ते एका झगमगाट असलेल्या दक्षिण भारतीय लग्नाला उपस्थित असून त्यात #RishMi एकमेकांच्या पोशाखांमध्ये रंगसंगती साधत पारंपारिक दक्षिण भारतीय वेशात दिसून येतील. लक्ष्मी पांढऱ्या आणि सोनेरी काठाच्या अतिशय सुंदर अशा रेशमी ‘कासावू’ साडीमध्ये दिसून येईल आणि त्यासोबत तिने नाजूक असे सोन्याचे दागिने परिधान केले असून गजरा माळलेला केसांचा अंबाडा घातला आहे. तर दुसऱ्या बाजूला रिषी हुबेहूब एखाद्या दक्षिण भारतीय हीरोप्रमाणे पारंपारिक पांढरी धोती आणि कुर्ता यांमध्ये अगदी राजबिंडा दिसत आहे. ‘भाग्यलक्ष्मी’मध्ये त्यांचे हे नवीन लूक्स आणि दक्षिण भारतीय विवाहाची सांस्कृतिक भव्यता पाहण्यासाठी सज्ज व्हा.
ऐश्वर्या म्हणाली, “आगामी ट्रॅक्ससाठी मी अतिशय उत्साहात आहे कारण मला त्यासाठी सुंदर दक्षिण भारतीय वेडिंग लूक घ्यायला मिळणार आहे. मला साड्या नेसायला आवडतात, मला वाटतं त्या खूपच सुंदर दिसतात आणि ह्यावेळेस मला पांढरी आणि सोनेरी काठाची कासावू साडी नेसायला मिळणार आहे. ही साडी खास निमित्त असेल तरच नेसतात. टीमने त्यासोबत साधेसे पण सुंदर सोन्याचे दागिने आणि माझ्या केसांचा अंबाडा बांधून त्यावर गजरा माळण्याचा लूक ठरवला आहे. थोडक्यातच खूप काही असते असे मला वाटते आणि हा लूक ते सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे. रिषीसुद्धा दिमाखदार पांढरी धोती आणि कुर्ता यांमध्ये अतिशय सहजपणे वावरताना दिसेल. मला खात्री आहे की प्रेक्षकांना मालिकेतील हा आगामी ट्रॅक निश्चितपणे आवडेल.”
रिषी आणि लक्ष्मी आपापल्या ह्या नवीन अवतारांमध्ये अतिशय आकर्षक दिसत असताना, प्रेक्षकांसाठी आगामी भाग पाहणे रोचक ठरेल जिथे रिषी आणि लक्ष्मी मित्राच्या लग्नामध्ये पती आणि पत्नी बनून लग्नामधील काही विधी करताना दिसून येतील.