
no images were found
तंत्रज्ञान अधिविभागातील “सिव्हिल अभियांत्रिकी” विभागामधून २९ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांनमध्ये निवड
कोल्हापूर (प्रतिनिधी): अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिवाजी विदयापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागामध्ये विविध शाखांसाठी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले जात आहे. या माध्यमातून २०२३-२०२४ या वर्षी अधिविभागातील स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी विभागामधून २९ विद्यार्थ्यांची नियुक्ती नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमधे झालेली आहे. विभागातील इतर शाखामधून देखील अनेक विद्यार्थ्यांची राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमधे निवड होत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक व अभिनंदन विभागाकडून केले जात आहे.
या निवडप्रक्रियेत अदानी सिमेंट या कंपनीने तन्मय गिर्हे, हर्षद केंगले, बाबासाहेब गलबे, शाम पाटील, या विद्यार्थ्यांची “टेकनिकल इंजिनिअर” या पदावर वार्षिक ४.५ लाखाचे पॅकेज देऊन निवड केली आहे. स्कॉन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीने ममता जाधव, दिव्या भगरे, साक्षी सुपाने, ऋतुराज फल्ले, ऋषिकेश वेखंडे, शिवकुमार माने, याना “डिझाईन इंजिनिअर” या पदावर वार्षिक ३ लाखाचे पॅकेज देऊन नियुक्त केले आहे. केनेस्ट मॅनुफ्रॅक्चरर प्रा. लि. यांनी ओंकार कटके याची एक्सिक्युशन इंजिनिअर या पदी वार्षिक ३ लाखाचे पॅकेज देऊन निवड केली आहे. आर.डी. सी. कॉंक्रिट या कंपनीने एस. माने याची ४. ५ लाखाचे पॅकेज देऊन ट्रेनी इंजिनिअर म्हणून
निवड केली आहे. तसेच टोटल टेक प्रा.लि. या कंपनीने सिव्हिल विभागातून १६ विद्यार्थ्यांची प्रोजेक्ट इंजिनिअर म्हणून नेमणूक केलेली आहे.
तंत्रज्ञान अधिविभागाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के सर, प्र.कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील सर व कुलसचिव डॉ. व्ही. एन शिंदे सर यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक प्रा. डॉ. एस. एन. सपली, शिवाजी विद्यापीठ प्रशिक्षण व प्लेसमेंट सेल अधिकारी डॉ. राजन पडवळ, तंत्रज्ञान विभागाचे प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा. गणेश पाटील, स्थापत्य विभाग प्रमुख प्रा.महेश साळुंखे व त्यांचे सहकारी प्राध्यापक, प्लेसमेंट प्रतिनिधी प्रा. वैभव कांबळे व प्रा. अनिकेत रेणावीकर यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.