Home Uncategorized राम मंदिरची सुरक्षा व्यवस्था कठोर करण्याकडे केंद्र सरकारने घातले लक्ष !

राम मंदिरची सुरक्षा व्यवस्था कठोर करण्याकडे केंद्र सरकारने घातले लक्ष !

1 second read
0
0
25

no images were found

राम मंदिरची सुरक्षा व्यवस्था कठोर करण्याकडे केंद्र सरकारने घातले लक्ष !

लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात धक्का बसला आहे. राम मंदिर पूर्ण झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील लोकांनी भाजपला नकारले. अयोध्येतही भाजप उमेदवार पराभूत झाला. त्यानंतर आता मोदी 3.0 सरकारचे कामकाज सुरु होताच अयोध्येसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्येत नॅशनल सिक्यूरिटी गार्डचे (NSG) हब बनवण्यात येणार आहे. अतिरेक्यांकडून होणारा धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिरेकी हल्ल्यांमुळे देशातील इतर संवेदनशील ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
अयोध्येत राम मंदिराचे निर्माण झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे राम मंदिरची सुरक्षा व्यवस्था कठोर करण्याकडे केंद्र सरकारने लक्ष दिले आहे. अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर देशभरातून येणाऱ्या भाविकांची गर्दी प्रचंड वाढली आहे. रोज दीड लाखांपेक्षा जास्त भाविक येत आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कठोर करण्याकडे पावले उचलण्यात आली आहे. आता केंद्र सरकारने अयोध्येत एनएसजी हब बनवण्यासाठी योजना तयार केली आहे. एनसीजीमध्ये ब्लॅक कॅट कमांडो तैनात असतात.
केंद्र सरकारने अयोध्येत एनएसजी कमांडो तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. अयोध्येत येणाऱ्या रामभक्तांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. तसेच दहशतवादी हल्ल्यासारखा परिस्थितीचा सामना करण्यासाठी या योजनेवर काम करण्यात आले आहे. अयोध्या मंदिराच्या सुरक्षेचे नेतृत्व एनएसजीकडे देण्यात येणार आहे. एनएसजी कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन करण्यासाठी नेहमी तयार असते.
केंद्र सरकारकडून अयोध्येत एनएसजी नियुक्तीची पूर्ण तयारी केली गेली आहे. यासंदर्भात राज्य सरकारला माहिती दिली आहे. एनएसजी हब करण्यासाठी जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सध्या अयोध्येची सुरक्षा एसएसएफकडे दिली आहे. या कमांडोना एनएसजीकडून प्रशिक्षण दिले गेले आहे. स्पेशल फोर्सचे 200 कमांडो अयोध्याची सुरक्षा पाहत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…