no images were found
सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी यूपी
सरकाने केली सरन्यायाधीश यांच्या मुलाची नियुक्ती
नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांचा मुलगा श्रीयश यू. लळित यांची उत्तर प्रदेश सरकारने सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी यूपी सरकारने नियुक्त केलेल्या वरिष्ठ वकिलांच्या पॅनेलचा ते एक भाग आहेत.
शनिवारी योगी सरकारमधील विशेष सचिव निकुंज मित्तल यांनी एक अधिसूचना जारी केली. श्रीयश यांच्या व्यतिरिक्त यूपी सरकारने सुप्रीम कोर्टात आणखी तीन सरकारी वकिलांची नियुक्ती केली आहे. न्यायमूर्ती लळित यांनी अलीकडेच सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आहे. ते केवळ ७४ दिवस या पदावर राहतील.
लळित यांच्या कुटुंबातील चार पिढ्या न्यायव्यवस्थेशी संबंधित आहेत. श्रीयशची पत्नीही वकील आहे. यू यू लळित यांचे आजोबा उमेश रंगनाथ लळित हे सोलापूरमध्ये वकील होते. त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी तेथे काम केले होते. सरन्यायाधीशांचे वडील उमेश लळित हे देखील पेशाने वकील आहेत. पुढे त्यांनी उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले. सरन्यायाधीश यांना दोन मुलगे आहेत. मोठा मुलगा श्रीयश याची यूपी सरकारने वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा धाकटा मुलगा हर्षद अमेरिकेत संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे.