Home क्राईम मलवडीत गोळीबार करत दरोडा; ५० तोळे सोने, ४० किलो चांदीसह लाखोंची लूट

मलवडीत गोळीबार करत दरोडा; ५० तोळे सोने, ४० किलो चांदीसह लाखोंची लूट

3 second read
0
0
48

no images were found

मलवडीत गोळीबार करत दरोडा; ५० तोळे सोने, ४० किलो चांदीसह लाखोंची लूट
दहिवडी : बंदूक व तलवारीचा वापर करून मलवडी (ता. माण) येथे सोने-चांदी व्यावसायिकाकडील ५० तोळे सोने, ४० किलो चांदी व रोख सात लाख रुपये लुटल्याची घटना सायंकाळी घडली. या घटनेदरम्यान एका संशयिताने व्यावसायिकासह त्याच्या पुतण्यावर तलवारीने वार केले. मात्र, त्यालाच दोघांनी पकडून ठेवले. या संशयितास सोडवण्यासाठी लुटारूंनी गोळीबारही केला. या खळबळजनक घटनेमुळे माण तालुक्यासह जिल्हा हादरला आहे.
मलवडी येथील बस स्थानक परिसरात मलवडी-बुध रस्त्याकडेला आर. एल. कॉम्प्लेक्समध्ये श्रीकांत तुकाराम कदम यांचे जय भवानी ज्वेलर्स नावाचे सोने-चांदीचे दुकान आहे. दिवसभर व्यवसाय केल्यानंतर सायंकाळी साधारण साडेसातच्या सुमारास दुकानातील सर्व ऐवज त्यांनी तीन पिशव्यांमध्ये भरला. त्यात ४० तोळे सोने, साधारण ५० किलो चांदी व रोख सात लाख रुपये असा ऐवज होता. या पिशव्या घेऊन ते आपल्या दुचाकीवरून पुतण्या श्रीजित शिवाजी कदम याच्यासोबत घरी निघाले होते.
सायंकाळी सात वाजून ४० मिनिटांच्याे दरम्यान मलवडीच्या त्रिंबकराव काळे विद्यालयातील रस्त्याने जात असताना अचानक एक जण समोर आला. संशय आल्यामुळे त्यांनी गाडी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेवढ्यात अजून तिघे जण धावत आले. त्यांनी श्रीजितला जोरात दणका दिला. त्यामुळे श्रीकांत यांचा गाडीवरील ताबा सुटून गाडी खाली पडली. गाडीवरून खाली पडलेल्या तीन पिशव्या दोघांनी उचलल्या व तिघे त्यांच्या दुचाकींकडे पळाले, तर एकाने तलवारीने श्रीजित याच्या हातावर, तर नंतर श्रीकांत यांच्या खांद्यावर वार केला. अशा अवस्थेतही या दोघा चुलत्या-पुतण्यांनी मिळून या संशयिताला पकडून ठेवून जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली.
आपला साथीदार परत आलेला नाही, हे लक्षात येताच एक जण दुचाकीवरून परत आला व त्याने बंदुकीतून तीन-चार वेळा गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी चुकवताना श्रीकांत यांनी पकडून ठेवलेल्या संशयितास पुढे केल्याने त्याच्या पाठीला चाटून गोळी गेली. ही झटापट सुरू असतानाच ग्रामस्थ जमा होऊ लागल्याने तीन चोरटे पळून गेले.
या घटनेची माहिती दहिवडी पोलिस ठाण्यात दिल्यानंतर तत्काळ सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोचले. पकडलेल्या चोरट्यावर प्राथमिक उपचार करून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित चोरट्यांचा तपास वेगात सुरू असून रात्रीच अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलिस उपअधीक्षक गणेश केंद्रे यांनीही घटनास्थळी भेट दिली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…