
no images were found
नरेंद्र मोदी आज पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅबिनेट बैठक बोलावली असून आजच्या बैठकीनंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. हा राजीनामा औपचारिक म्हणून देण्यात येईल. त्यानंतर पुढील निर्णय होईपर्यंत राष्ट्रपती त्यांना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यभार पहाण्याची सूचना करु शकतात. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एनडीए सोबत सरकार स्थापनेचा दावा करु शकतात. आज एनडीएची बैठक होणार आहे.