
no images were found
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यापीठात चर्चासत्र
कोल्हापूर(प्रतिनिधी) : यावर्षी उन्हाळ्यात देशभरात तापमानाच्या काट्याने उच्चांक केला. कोल्हापूर देखील त्याला अपवाद नाही. उन्हाळ्यातील 5/6 दिवस कधी तरी 38-39 अंशांवर जाणारे तापमान यावर्षी महिना – दीड महिना 39 अंशांवर होते. कोल्हापूर आणि एकूणच वाढलेले तापमान हा एक गंभीर प्रश्न बनलेला आहे. याला अनेक कारणे आहेत. जागतिक तापमान वाढ, अल निनो परिणाम तसेच स्थानिक कारणे देखील या परिस्थितीला कारणीभूत आहेत.
या पार्श्वभूमीवर 5 जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त सकाळी १०.३० वाजता ‘कोल्हापूर@ 41°c’ या चर्चासत्राचे आयोजन शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र अधिविभागात केलेले आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के असून कोल्हापुरातील पर्यावरणातील जाणकार या चर्चासत्रात सहभागी होतील. तरी कोल्हापुरातील नागरिकांनी या चर्चासत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.