no images were found
शिवाजी विद्यापीठाचा महिला सॉफ्टबॉल संघ आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना
कोल्हापूर (प्रतिनिधी):- दिनांक ४ ते ८ जून २०२४ रोजी लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पगवारा, जालंधर (पंजाब) येथे ऑल इंडिया इंटर युनि्हर्सिटी सॉफ्टबॉल महिला स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा महिला सॉफ्टबॉल संघ सहभागी होत आहे. गत दोन वर्ष महिला सॉफ्टबॉल संघाने अनुक्रमे कास्य पदक व रौप्य पदक प्राप्त करून या राष्ट्रीय विद्यापीठ पातळीवर दबदबा निर्माण केला आहे. *’या वर्षी हा संघ पुन्हा यश प्राप्त करत सुवर्ण पदकाची कमाई करेल’ अशी आशा व्यक्त करत कुलगुरु प्रा.डॉ. डी.टी. शिर्के यांनी संघास शुभेच्छा दिल्या.*
या संघात शिवछत्रपती पुरस्कार विजेती खेळाडू संघाची कर्णधार कु. स्वप्नाली वायदंडे, कु. ऐश्वर्या पूरी, कु. करिश्मा कुडचे, कु. प्रियंका अंची (सर्व शिवाजी विद्यापीठ), कु. श्रावणी चौगुले, कु. सानिका संकपाल, कु. अलिशा कांबळे, कु. स्वाती कांबळे (सर्व महावीर कॉलेज, कोल्हापूर) कु. मनिषा पवार, कु. आर्या पाटील (ए. सी. एस. कॉलेज, पलुस) कु. निकिता पाटील, कु. दिक्षा शिंदे (डॉ. पी. कदम महा. रामानंदनगर), कु. हर्षदा कांबळे (कन्या महा. मिरज) कु. सलोनी नलवडे (एस. जी. एम. कॉलेज, कराड), कु. करिश्मा तारळेकर (विलिंग्डन कॉलेज, सांगली) निवड झाली आहे. संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. डॉ.बाबासाहेब सरगर व मार्गदर्शक म्हणून प्रा. सुशांत कायपुरे हे काम पाहत आहेत.
यावेळी प्र कुलगुरू .प्रा डॉ. पी. एस.पाटील, कुलसचिव डॉ. व्हि. एन. शिंदे आणि शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ.शरद बनसोडे, प्राचार्य डॉ. बाबासो उलपे , डॉ राजेंद्र रायकर यांनी संघाला शुभेच्छा दिल्या.