no images were found
उंचगाव मध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने भीषण खून.
कोल्हापूर : उचगाव येथील कृषी महाविद्यालयाच्या परिसरात 40 वर्षाचा युवक गणेश नामदेव संकपाळ यांचा धारदार शस्त्राने निर्घुण खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. पोटावर एक, पाठीवर दोन धारदार शस्त्राने वार करून सिमेंटच्या पाईपचा तुकडा डोक्यात घालून हा खून करण्यात आला आहे. खूनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
गणेश कॉलनीतील गणेश संकपाळ हा बुधवारी रात्री साडेसात वाजता डॉक्टरांकडे जाऊन येतो असे सांगून घरातुन पडला होता.तो रात्री घरी परत आलाच नाही. कुटूंबाने इतर ठिकाणी शोध घेतला पण तो मिळून आला नाहीं.गणेश हा उचगाव उड्डाणपूला जवळील ओढ्याच्या जवळ असणाऱ्या एका फर्निचर दुकानात काम करत होता .आज पहाटे महामार्ग लगत कृषी महाविद्यालयाच्या आवारात एका व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यात माखलेला मृतदेह फिरायला जाणाऱ्या व्यक्तींनी पाहिला.त्यानंतर त्यांनी गांधीनगर पोलिसांना ही घटना कळवली. गांधीनगर पोलीसासह स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला. दरम्यान तलवार किंवा गुप्ती सारख्या धारदार शस्त्राने गणेशच्या पाठीवर दोन, पोटावर एक, तोंडावर वार करून सिमेंटच्या पाईपच्या तुकडा डोक्यात घालून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळी मृतदेह रक्ताचे थारोळ्यात पडला होता, चप्पल व रुमाल घटनास्थळी पडलेले होते. गणेशच्या हातावर गणेश ,संतोष व सिंहाचे चिन्ह कोरलेले होते यावरून त्याची ओळख पटली. पत्नी आल्यावर हा गणेशच असल्याचे सांगितले.गणेशला दारुचे व्यसन होते.त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.खूनाचे कारण अद्याप स्पष्ट नाहीं .गांधीनगर पोलिसांत खूनाचा गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. गांधीनगर बाजारपेठेत हनामारीच्या घटना तर नित्याच्याच बनलेल्या आहेत.भर रस्त्यात शस्त्राने मारहाण करण्याच्या घटना वाढलेल्या असून या वर पोलीस अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाहीं.वरिष्ठ अधिकारीही लक्ष देत नाहीत. त्यामुळे नागरिक भीतीच्या छायेत आहेत.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले करीत आहेत.