no images were found
कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ इचलकरंजी येथील महेश सेवा समिती या ठिकाणी पार पडला. संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन धूत, सचिव लालचंद गट्टानी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात पदग्रहण केले. उद्योगपती रामविलासजी मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली व समाजातील वरिष्ठ मार्गदर्शक चंदनमलजी मंत्री त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमास अखिल भारतीय महिला संघटन दक्षिण विभागाच्या उपाध्यक्षा सौ. अनुसयाजी मालू, रामस्वरूपजी मर्दा, शांतिकिशोरजी मंत्री, नंदकिशोरजी भुतडा, श्रीवल्लभजी बांगड, सौ. पुष्पाजी काबरा, रामगोपालजी मालानी, लक्ष्मीकांतजी बलदवा, संजय सारडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे माजी अध्यक्ष श्रीकांत मंत्री यांनी आपल्या कार्याचा आढावा सादर केला. त्यानंतर नूतन अध्यक्ष नितीन धूत यांनी अखिल भारतीय माहेश्वरी महासभेच्या तसेच महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या विविध योजना संघटनेच्या माध्यमातून राबविण्याचा संकल्प जाहीर केला. आरोग्य शिबिर आणि गरजू कुटुंबांसाठी अत्यंत माफक दरात घरकुल योजना राबवण्याचा संकल्प जाहीर केला. समाज उपयोगी कार्य करण्याची ग्वाही दिली. सौ. अनुसया मालू यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या तर शांतीकिशोर मंत्री यांनी संघटनेचा सामाजिक कार्याचा वारसा यापुढेही नव्या पदाधिकाऱ्यांनी राबवावा, असे आवाहन केले.
प्रमुख पाहुणे चंदनमलजी मंत्री यांनी कार्यकर्त्यांनी पदाचा अभिमान न ठेवता सर्वांशी विनम्रतेने वागून समाज उपयोगी कार्य करावे असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात रामविलासजी मुंदडा म्हणाले, “माहेश्वरी समाजाचा गौरवशाली इतिहास आहे. आपल्या सामाजिक संस्कारची परंपरा कायम ठेवत नव्या पिढीला बरोबर घेऊन कार्याचा वारसा असाच पुढे चालू ठेवावा.” नूतन अध्यक्ष नितीन धूत व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यासाठी शुभेच्छा देताना रचनात्मक कार्य करण्याचे आवाहन केले.
सचिव लालचंद गट्टाणी यांनी मनोगत व्यक्त करताना सचिव पदावर पुन्हा एकदा समाजाने संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करीत जबाबदारीने काम करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी उपाध्यक्ष बजरंगलाल काबरा, सुरेशचंद दरगड, दिलीप बजाज (करवीर), राजकुमार बलदवा (जयसिगपूर),
कोषाध्यक्ष: अशोक कुमार मंत्री, संगठन मंत्री : बालकिशन टुवाणी, सांस्कृतिक मंत्री : दामोदर बाहेती, सहसचिव श्रीकांत बंग, सुरेन्द्र हेडा, बिपीन जाजू (करवीर), अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य – श्रीकांत मंत्री, भिकुलाल मर्दा, घनश्याम इनाणी यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य : शांतिकिशोर मंत्री, वासुदेव बांगड, रामनिवास मुंदडा, कैलाशचंद धूत, मुकेश खाबाणी, रामअवतार भूतडा, श्यामसुंदर झंवर, मोहनलाल चांडक (करवीर), दिलीप बजाज (जयसिंगपूर) यांनी पदभार स्वीकारला.