Home शासकीय  अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी शाळेत मोफत प्रवेश सुरु

 अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी शाळेत मोफत प्रवेश सुरु

3 second read
0
0
105

no images were found

 अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी शाळेत मोफत प्रवेश सुरु

 

कोल्हापूर: गगनबावडा येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी शाळेत मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकरिता मोफत शाळा प्रवेश देण्यात येत आहे. यासाठी शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये इयत्ता 6 वी ते 10 वी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, विशेष मागास प्रवर्ग, अपंग इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत भोजन, निवास, शिक्षण व इतर शैक्षणिक सोयीसुविधा पुरविण्यात येतात. शाळेत प्रवेश घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर व अनुसुचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, गगनबावडा, कोल्हापूर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे  आवाहन अधिक्षक विवेक चेचर यांनी केले.

अधिक माहितीसाठी अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, कोल्हापूर ग्रामीण रुग्णालय गगनबावडा शेजारी गगनबावडा, कोल्हापूर भ्रमणध्वनी क्रमांक9049212004 वर संपर्क साधावा.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात

‘बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात…