no images were found
कृषी व तंत्र विद्यापीठाला गांडूळ खत चाळणी यंत्रासाठी पहिले पेटंट
कोल्हापूर (प्रतिनिधी): डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागातील एम. टेक. कृषीचे विद्यार्थी अमोल गाताडे यांनी निर्मित केलेल्या गांडूळ खत चाळणी यंत्रासाठी भारतीय पेटंट प्राधिकरणाकडून पेटंट प्राप्त झाले आहे. डॉ. सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाख़ाली गाताडे यांनी हे संशोधन केले. विद्यापीठाला मिळालेले हे पहिले पेटंट आहे.
याबाबत बोलताना कुलगुरू प्रोफेसर डॉ. के प्रथापन म्हणाले या शोधांतर्गत प्रमाणित केलेले हे यंत्र शेतकरी व उद्योजकांना सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. हे यंत्र प्रोटोटाइप कार्यक्षम असून सेंद्रिय शेतीद्वारे शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी लाभदायक ठरेल. हे विद्यापीठ दोनच वर्षापूर्वी सुरु झाले असून या कालावधीत कृषी संशोधनावर विशेष भर दिला जातो.
या संशोधनामध्ये अमोल गाताडे यांच्यासहित कुलगुरू प्रा. डॉ. के प्रथापन, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत, प्राचार्य डॉ. सुहास पाटील, डॉ. रणजित पवार, असोसिएट डीन डॉ. जयंत घाटगे या संशोधकांचा समावेश आहे.
या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष माजी आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी गाताडे व सहकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.