Home सामाजिक एनजीओ कंपॅशन २४, कोल्हापूर वुई केअर आणि निसर्ग अंकुर ह्यांच्यावतीने येत्या २४ आणि २५ ऑगस्ट रोजी रानभाज्या उत्सव

एनजीओ कंपॅशन २४, कोल्हापूर वुई केअर आणि निसर्ग अंकुर ह्यांच्यावतीने येत्या २४ आणि २५ ऑगस्ट रोजी रानभाज्या उत्सव

0 second read
0
0
14

no images were found

एनजीओ कंपॅशन २४, कोल्हापूर वुई केअर आणि निसर्ग अंकुर ह्यांच्यावतीने येत्या २४ आणि २५ ऑगस्ट रोजी रानभाज्या उत्सव

कोल्हापूर/ प्रतिनिधी : सह्याद्री डोंगररांगा ,कोकण आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भागात, जंगलात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आणि सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या आरोग्यदायी, पौष्टिक व औषधी अशा रानभाज्यांची ओळख सर्वांना होऊन, निसर्गप्रेमींनी या रानभाज्या आपल्या परसबागेत लावाव्यात, तसेच शेतकऱ्यांनी महत्वाच्या दुर्मिळ रानभाज्यांची शेतात लागवड करुन त्यांचे फायदे मिळवावेत ह्यादृष्टीने एनजीओ कंपॅशन २४,कोल्हापूर वुई केअर आणि निसर्ग अंकुर ह्यांच्यावतीने श्रावण मासाचे औचित्य साधून जवळपास १६० हुन अधिक रानभाज्यांचे माहितीपूर्ण प्रदर्शन येत्या २४ आणि २५ ऑगस्ट २०२४ रोजी जैन बोर्डिंग, दसरा चौक, कोल्हापूर येथे सकाळी १० ते रात्री ८ ह्या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती एनजीओ कंपेंशन २४ आणि कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ह्या प्रदर्शनाचे उदघाटन शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ.पी‌. एस.पाटील,कृषी अधिकारी उमेश पाटील ह्यांच्या हस्ते होणार असून
अतिरिक्त जिल्हाधिकारी कोल्हापूर
संजय शिंदे, मुद्रांक जिल्हाधिकारी
बाबासाहेब वाघमोडे आणि करवीर
तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार हे मान्यवर प्रदर्शनाला खास भेट देतील.
निसर्ग वनस्पती विविधतेने अत्यंत समृद्ध आहे. पुरातन काळापासून,पारंपारिकपणे अनेक रानभाज्या आवडीने शिजविल्या व खाल्ल्या जातात. निसर्गात अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या गारंबीची ४ फुटी शेंग ,टेटूची तलवारीसारखी २ फुटी शेंग, खाजकुहीलीचे वेल,शेरणी ,चन्नी चे वेल, सोनार वेल, कांड्याचित्रक, गाजरीची भाजी, खरशिंग शेंगा, कडवी,अमरकंद, नळीची भाजी, समुद्रशोक, दगडावर वाढणारा जैताळू, खडक अंबाडी, गिरजाला, सागरी किनाऱ्यावर वाढणारी समुद्रीय घोळ अशा कधीही सहज न बघायला मिळणाऱ्या रानभाज्या आपल्याला इथे बघता येतील . रुकाळू ( वृक्षांवर उगवणारा अळू ), तीनतोंडी , मांजरी, बाफेली, सफेद मुसळी,कडवी, कोळयाचो माड अशा अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या रानभाज्या तसेच करटोली, दिंडा, कुडा,आंबुशी, पाथरी,कुरडू ,बांबू कोंब ,रानगवर, केना,पानांचा ओवा, कपाळफोडी, चिवळ, आघाडा,काटेमाठ, घोळभाजी,अंबाडा, सुरण , टाकळा ,मटारू, भुई आवळी, भारंगी ह्या औषधी गुणांनीयुक्त आरोग्यवर्धक असलेल्या अनेक रानभाज्या आपल्याला ह्या प्रदर्शनात बघता येतील. लोकांना ह्या रानभाज्यांची ओळख आणि चांगली माहिती मिळावी म्हणून मोहन माने, कोल्हापूर यांच्या परिश्रमातून रानभाज्यांचे हे माहितीपूर्ण प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. अथक प्रयत्नांनी अनेक रानभाज्यांची बियाणे व तरु वापरून त्यांची रोपे कुंड्यांत तयार करण्यात आली असून ह्या रानभाज्यांच्या कुंड्या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
ह्या प्रदर्शनात मार्गदर्शन आणि सहकार्य मिळतेय ती, रानभाज्यांची ओळख, संवर्धन व संरक्षण याकरिता सन २०१० पासून विविध कृतीशील उपक्रम राबविणाऱ्या वनस्पती तज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर ह्यांच्या “निसर्ग अंकुर “ ह्या संस्थेची. ह्या संस्थेतर्फे छायाचित्रांसह माहितीपूर्ण प्रदर्शन,मार्गदर्शक पुस्तके ,रानभाज्या पाककृती प्रात्यक्षिके व स्पर्धा ,तसेच रानभाज्या खाद्यमहोत्सव याचे सातत्याने आयोजन करण्यात येते.याबरोबरच संस्थेतर्फे दरवर्षी रानभाज्या शोधमोहीम राबविण्यात येते व विविध प्रदेशात वापरात असलेल्या नवनव्या रानभाज्यांची माहिती संकलित करण्यात येते.
ह्या अनोख्या रानभाज्यांची चव चाखता यावी म्हणून, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स ठेवण्यात येणार असून, ह्या रानभाज्या आणि त्यांची रोपे प्रदर्शनस्थळी विक्रीसाठी उपलब्ध असतील.
ह्या वेळच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे २५ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२:३० वाजता प्रदर्शनस्थळी खास महिलांसाठी भरवण्यात येणारी रानभाज्यांची पाककृती स्पर्धा ( ग्रामीण व शहरी विभाग ) आणि त्यासोबत रोख पारितोषिक / सर्टिफिकेट जिंकण्याची संधी ….
आजच खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा .स्पर्धेत नाव नोंदवून सहभागी व्हा….

सौ . मंजिरी कपडेकर – 9373319495
ऐश्वर्या कपडेकर – 7620619495

” लेट्स गेट बॅक टू अवर रूट्स ” ह्या ब्रीदवाक्याचा अंगिकार करून आपण महाराष्ट्राच्या मातीत फुलणाऱ्या ,रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक रानभाज्यांची माहिती घेऊन ,चौकस आहारातून सुदृढ पिढी घडवण्यासाठी विद्यार्थी, महिला,आबालवृद्ध तसेच सर्व नागरिकांनी ह्या एकमेव वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन एनजीओ कंपेंशन २४, कोल्हापूर वुई केअर चे अध्यक्ष मिलिंद धोंड ह्यांनी केले आहे.
हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून प्रवेश विनामूल्य आहे.
चॅनल बी हे ह्या प्रदर्शनाचे मीडिया पार्टनर असून गार्डन क्लब कोल्हापूर, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज ,इक्वीटास, सौ.मंजिरी कपडेकर कूकींग क्लासेस, युथ ऍनेक्स आणि वुई केअर हेल्पलाईन तसेच डॉ.एन.डी.पाटील महाविद्यालय, मलकापूर ह्या संस्थांच्या मोलाच्या सहकार्याने हे प्रदर्शन पार पडणार आहे.
पत्रकार परिषदेस निसर्ग अंकुरचे अध्यक्ष डॉ.मधुकर बाचुळकर, डॉ. अशोक वाली, पल्लवी कुलकर्णी, स्मिता सावंत, मंजिरी कपडेकर , अभिजित पाटील, सुशिल रायगांधी,किशोर शिंदे,अनिल वेल्हाळ,प्रदर्शनाचे प्रोजेक्ट चेअरमन सुशांत टक्कळकी, को -चेअरमन अमृता वासुदेवन, स्मिता घोसळकर, कविता घाटगे आणि गार्डन क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…