
no images were found
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विद्यापीठात अभिवादन
कोल्हापूर (रातीनिधी) : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षास आजपासून प्रारंभ झाला. शिवाजी विद्यापीठात अहिल्यादेवींना जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीमध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, आयक्यूएसी संचालक डॉ. सागर डेळेकर,
विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासनाचे समन्वयक डॉ. मच्छिंद्र गोफणे, ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पवार, अविनाश भाले, डॉ. किशोर खिलारे, अधिसभा सदस्य अॅड. अभिषेक मिठारी यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षारंभाच्या निमित्ताने विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ या वाहिनीसाठी ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि समकाळ’ या जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीचे पुनर्प्रसारण करण्यात आले. विद्यापीठातील सर्व घटकांनी या मुलाखतीचा लाभ घेतला.