no images were found
मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु
कोल्हापूर: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत इचलकरंजी येथे असणाऱ्या 125 वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहामार्फत मागासवर्गीय समाजातील विद्यार्थिनींची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी वसतिगृहात मोफत प्रवेश देण्यात येत आहे. यासाठी शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये 8 वी, 11 वी, व्यावसायिक महाविद्यालय, बिगर व्यावसायिक महाविद्यालयामध्ये कोल्हापूर शहर व परिसरामधील प्रवेश घेऊ इच्छुक विद्यार्थिनींनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापूर 125 वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, इचलकरंजी, कोल्हापूर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन 125 वी जयंती मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या गृहपालांनी केले आहे.
वसतिगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय, इतर मागास व आर्थिकदृष्ट्या मागास, अपंग, अनाथ प्रवर्गातील विद्यार्थिनींना मोफत शैक्षणिक सोयीसुविधा पुरविण्यात येतात. अधिक माहितीसाठी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, इचलकरंजी, कोल्हापूर भ्रमणध्वनी क्रमांक 7219365006 वर संपर्क साधावा.