no images were found
एचईटीएस कडून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये १०० टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती देणाऱ्या स्टार स्कॉलरशिप परीक्षेची घोषणा
कोल्हापूर,( प्रतिनिधी ): हायर एज्युकेशन टॅलेंट स्किल (एचईटीएस) या संस्थेकडून ऑफीच्या सहयोगाने स्कॉलरशिप टेस्ट फॉर ऑल राऊंडर्स (स्टार) या प्रतिष्ठित परीक्षेची घोषणा केली आहे. या अद्वितीय शिष्यवृत्ती प्रोग्राममुळे १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये १०० टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती मिळवून आपले उच्चशिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळेल. स्टारच्या या शिष्यवृत्तीमुळे कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रम अशा विविध प्रकारचे उच्चशिक्षण सर्व सामाजिक आर्थिक गटांमधील विद्यार्थ्यांना घेता येईल. ही शिष्यवृत्ती गुणवत्तेला प्रोत्साहन तर देतेच पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या आड येणारे आर्थिक अडथळेही दूर करते. इच्छुक विद्यार्थ्यांनी १० जून २०२४ पर्यंत ऑफिशियल रजिस्ट्रेशन लिंक वर नावनोंदणी करता येईल.
या शिष्यवृत्तीबाबत आपला आनंद व्यक्त करताना एचईटीएस मंडळाचे सुकाणू समिती प्रमुख आणि सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, मुंबईचे कुलगुरू तसेच यूजीसीचे माजी अध्यक्ष आणि नॅकचे संचालक प्रा. (डॉ.) व्ही. एन. राजशेखरन पिल्लई म्हणाले की, “गुणवंत मुलांना उत्तम दर्जाच्या शिक्षण संधी देणाऱ्या या स्टार शिष्यवृत्ती उपक्रमाची घोषणा करताना मला खूप आनंद होतोय. हा उपक्रम शिष्यवृत्ती मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतांचा पूर्ण वापर करणे शक्य करेल. त्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत देऊन त्यांना प्रेरितदेखील करेल. शिक्षण हा प्रगतीचा पाया आहे. या शिष्यवृत्तींच्या माध्यमातून आम्ही माणसांमध्ये तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासातही गुंतवणूक करत आहोत.”
ऑनलाइन नोंदणी करून आपले प्रोफाइल पूर्ण भरल्यानंतर विद्यार्थ्यांना भागीदार युनिव्हर्सिटी संकुलात ऑफलाइन डिजिटल टेस्ट द्यावी लागते. या टेस्ट ऑफीच्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाने व्यवस्थापित आणि सुरक्षित केलेल्या आहेत. परीक्षेच्या गुणांचे विश्लेषण करून ते विद्यापीठांसोबत तपासले जातात. त्यानंतर निकालांची घोषणा केली जाते आणि विद्यार्थ्यांना योग्य त्या संस्थांशी जोडण्यात येते.
मूल्यमापन प्रक्रियेतून विविध घटकांना भारांक दिले जातात. यातील ७५ टक्के गुण शैक्षणिक ज्ञान, सामान्य बुद्धिमत्ता आणि कौशल्य यांना दिले जातात. याशिवाय १०-१६ टक्के गुण शैक्षणिक कामगिरी आणि मागच्या तीन वर्षांतील सातत्यपूर्णतेला दिले जातात. त्यातून स्थैर्य आणि सर्वोत्तमता यांच्यावर भर दिला जातो. उर्वरित १०-१५ टक्के गुण बिगर शैक्षणिक कामगिरीवर भर देतात. त्यात शिक्षणेतर उपक्रम आणि समाजसेवा यांच्यामधील सहभाग या गोष्टी समाविष्ट केल्या गेल्या आहेत.
या स्कॉलरशिप अलोकेशन फ्रेमवर्कच्या माध्यमातून एचईटीएस चार श्रेण्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वोत्तमतेची ओळख पटवते. त्यात विविध प्रकारच्या टॅलेंट्स आणि त्यांच्या क्षमतांचा समावेश आहे. जसे:
सुपर स्टार्स: टॉप २ टक्के , पूर्ण शिष्यवृत्ती: ९०-१०० टक्के शिक्षण शुल्क
ऑल राऊंडर्स: टॉप ५ टक्के , आंशिक शिष्यवृत्ती: ८०-९० टक्के शिक्षण शुल्क
रायझिंग स्टार्स: टॉप १० टक्के, महत्त्वाची शिष्यवृत्ती: ५०-८० टक्के शिक्षण शुल्क
शायनिंग स्टार्स: टॉप २० टक्के , गुणवत्तेवर आधारित शिष्यवृत्ती: ४०-५० टक्के शिक्षण शुल्क
स्टारकडून विद्यार्थ्यांना शिक्षणापलीकडे जाऊन आपली गुणवत्ता आणि कौशल्ये प्रदर्शित करण्याची संधी दिली जाते. ऑफीच्या मदतीने एका सर्वांगीण मूल्यमापन आराखड्याच्या माध्यमातून स्टार विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये शिष्यवृत्ती घेऊन शिक्षणाच्या संधी मिळवण्यासाठी मदत करते. ही परीक्षा टॅलेंट ओळखण्यासाठी एक ससर्वसमावेशक दृष्टीकोन वापरते. सर्वोत्तमता आणि सहजसाध्यता यांची संस्कृती यात दिसून येते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या शैक्षणिक प्रवासात प्रगती करून यशस्वी होण्याची संधी मिळते.