no images were found
- श्रीमद आद्य शंकराचार्य जयंती उत्सव शनिवारपासून ,पीठाचे पुरस्कार जाहीर, २२ मे रोजी वितरण कोल्हापूर,( प्रतिनिधी ) :- आद्य शंकराचार्य जयंती उत्सवाचे १८ ते २३ मे २०२४ रोजी आयोजन केले आहे. या निमित्ताने उल्ल्खेनीय कार्य केलेल्यांचा गौरव पीठातर्फे करणार असल्याची माहिती प.प. श्री विद्यानृसिंह भारती यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
येथील श्री स्वामी जगदगुरू शंकराचार्य पीठातर्फे दरवर्षी आद्य शंकराचार्य जयंती उत्सवाचे आयोजन केले जाते. या निमित्त आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.या संदर्भात अधिक माहिती देताना स्वामीजी म्हणाले, श्रीमद जगदगुरू आद्य शंकराचार्य यांचा २५३२ वा उत्सव आहे. या निमित्ताने आठवडाभर प्रवचन, कीर्तन, गायन व देवी भागवतचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पीठातर्फे गौरव
करण्यात येईल. यामध्ये वैदिक पुरस्कार राघव रामदासी, पुणे, सांस्कृतिक पुरस्कार गोविंद शास्त्री जोशी, सातारा, कीर्तनकार पुरस्कार शरद आंबेकर, हिंगोली, स्थानिक वैदिक पुरस्कार संदीप काजरेकर, कोल्हापूर, सामाजिक गौरव संभाजी ऊर्फ बंडा साळुंखे, कोल्हापूर, महिला कीर्तनकार अस्मिता अरुण देशपांडे, डोंबिवली, होतकरू विद्यार्थी वाचस्पती कुलकर्णी, परभणी आणि उत्कृष्ट शासकीय कर्मचारी डी. वाय. पाटील, कोल्हापूर यांचा गौरव करण्यात येणार आहे. २२ मे रोजी सकाळी दहा वाजता पीठामध्ये पुरस्कार वितरण होईल. याचबरोबर वरील सर्व कार्यक्रमही पीठामध्येच होतील.
स्वामीजी म्हणाले, गुरुवार, ता. २३ मे रोजी पालखी प्रदक्षिणा आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे. यामध्ये व सर्वच कार्यक्रमांचा भक्तांना मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.यावेळी सचिव शिवस्वरूप भेंडे उपस्थित होते.