no images were found
नॅनोसायन्सच्या विद्यार्थ्यांचे स्पर्धापरीक्षेत आणि संशोधनात यश
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनोसायन्स अॅण्ड बायोटेक्नॉलॉजीया अधिविभागमधील विद्यार्थ्यांनी पुन्हाएकदा आपले यशसिध्द केले आहे. चि. अमेय सबनीस आणि कु. निकिता पाटील यांनी पुन्हा एकदा नॅनोसायन्स अधिविभागाचे नाव लौकीक वाढवलाआहे. चि. अमेय माधव सबनीस (रा. गडहिंग्लज) याची निवड भारतसरकारच्या गृहखात्यात अधिकारी म्हणून झाली आहे. चि. अमेय, नॅनोसायन्सच्या२०२०च्या बॉचचागुणवान विद्यार्थी आहे. विशेष म्हणजे अमेयचा बी. एस. सी.-एम. एस सी नॅनोसायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी हा ५वर्षाचा इंटीग्रेटेडकोर्स कोरोना काळात पूर्ण झालीआहे. कोरोना काळात ध्येयासक्ती आणि अभ्यासावरील निष्ठा कायम ठेऊन त्याने स्पर्धापरीक्षेत यशसंपादन करुन गृहखात्यात नोकरी निवडली. कु. निकिता जगन्नाथ पाटील (रा. सांगली) हिनेसुद्धाबी. एस. सी.-एम. एस सी नॅनोसायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी हा कोर्स, पहिल्या क्रमांकाने कोरोना काळात पूर्ण केली आहे. त्यानंतर तिने भारतातील नामवंत कंपनी फ्लोरोसेंस परफ्युममध्ये रीसर्च आणि डेव्हलोपमेंट मध्ये अनेक नॅनोप्रॉडक्ट बनवलीआहेत. निकिता, सध्या अमृता युनिव्हर्सिटी, कोईम्बतूर येथे बायोसेन्सर या विषयातपी. एच डी पूर्ण करत आहे.विद्यार्थ्यांच्यामते,५वर्षाचा नॅनोसायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी हा इंटीग्रेटेडकोर्स शिकत असताना बहुविद्याशाखीय(Multidisciplinary)अभ्यासक्रमाचा फायदा स्पर्धापरीक्षा व संशोधन करताना झाला. नॅनोसायन्स मधील विद्यार्थ्यांची अशी विविधक्षेत्रातील उपलब्धी पाहून मा. कुलगुरू, मा. प्र-कुलगुरू आणि कुलसचिवयांचा आनंद द्विगुणित झाला. तसेच नॅनोसायन्स मधील विद्यार्थ्यांनी भविष्यात अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.नॅनोसायन्स अधिविभागाचे संचालक प्रा. डॉ. के. के. शर्मा तसेच सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या