
no images were found
शिवाजी विद्यापीठात छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात
कोल्हापूर(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठात आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनाच्या प्रवेशद्वारात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी जाधव, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील, भूगोल अधिविभाग प्रमुख डॉ. जगदीश सपकाळे, डॉ. दत्तात्रय मचाले आणि डॉ. उमाकांत हत्तीकट यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.