
no images were found
‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ’ माजी संचालकांना
आठवड्याच्या आत रक्कम भरण्याचा न्यायालयाचा आदेश
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांना ६ आठवड्याच्या आत रु.१०,७८,५९३/- भरण्याचे आदेश नुकतेच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिले आहेत.
हा आदेश माजी संचालकांना लागू आहे. त्यामध्ये माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, माजी अध्यक्ष विजय पाटकर, माजी अध्यक्ष विजय कोंडके, माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, माजी खजिनदार सतीश बिडकर, माजी कार्यवाह सुभाष भुरके, माजी सहखजिनदार अनिल निकम, माजी सहकार्यवाह संजीव नाईक, संचालक सतीश रणदिवे, माजी संचालिका प्रिया बेर्डे, माजी संचालिका अलका कुबल, माजी संचालक इम्तियाज बारगिर, माजी संचालक सदानंद सूर्यवंशी, माजी संचालक बाळकृष्ण बारामती व प्रमुख व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर यांना हा आदेश लागू आहे.
पुणे येथे झालेल्या मानाचा मुजरा या कार्यक्रमासाठी तात्कालीन संचालकांनी रु. ५२,००,००/- खर्च केले होते. यावर सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत आक्षेप घेतला होता व त्यानंतर कोल्हापूर येथील काही सभासदांनी धर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावर प्रथम चॅरिटी कमिशनर कोल्हापूर यांनी ही रक्कम भरण्याचा आदेश दिला होता, परंतु टंकलिखाणाची चूक झाल्याने तात्कालीन संचालकांनी रक्कम भरलीच नाही. अध्यक्ष मा. मेघराज राजेभोसले यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यानंतर पुन्हा एकदा कोल्हापूर चॅरिटी कमिशनर यांनी टंकलिखाणाची चूक सुधारून नव्याने आदेश काढून उपरोक्त रक्कम भरण्याचा आदेश दिला. परंतु यावेळी ह्याच संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर त्यांना प्रथम ही रक्कम न्यायालयात जमा करण्याचा आदेश मेहेरबान न्यायाधीशांनी दिला आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या इतिहासात प्रथमच सर्व संचालकांवर अशी कारवाई झाली आहे.