no images were found
आंदोलकांनी चंद्रकांत पाटलांना औरंगाबादमध्ये काळे झेंडे दाखवले
भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. यासंदर्भात औरंगाबादमधील अनेक संघटना चंद्रकांतदादा पाटील यांच्याविरोधात आंदोलन उभारत आहेत. औरंगाबादमधील गणपती संस्थानमध्ये दर्शनासाठी गेलेल्या चंद्रकांतदादा पाटील यांना अखिल भारतीय महात्मा फुले संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करीत काळे झेंडे दाखवण्यात आले. दरम्यान काळे झेंडे दाखविणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
आज सकाळी औरंगाबादच्या गणपती संस्थानमध्ये चंद्रकांत पाटील दर्शनासाठी पोहोचले. याचवेळी अखिल भारतीय महात्मा फुले संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करीत चंद्रकांतदादा पाटील यांना कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. आंदोलनकर्ते अचानकपणे आल्याने पोलीस थोडावेळ भांबावले परंतु पोलिसांनी थोड्याच वेळात परीस्थिती नियंत्रणात आणत आंदोलंकर्त्यांना ताब्यात घेतले. काळे झेंडे दाखविणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. महिला कार्यकर्त्यांची देखील आंदोलनात उपस्थिती दिसत होती.