no images were found
‘डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील तीन विद्यार्थ्यांची व्होरपाकिर्ंग कंपनीत उत्तम पॅकेजवरती निवड
इचलकरंजी (प्रतिनिधी): डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील तीन विद्यार्थ्यांची व्होरपार्किंग सिस्टीम प्रा. लि. या नामांकीत कंपनीत उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे. अपूर्वा जोलापूरे, उत्कर्ष सरदे व अनुजा पाचोरे हे विद्यार्थी पुणे येथील व्होरपार्किंग या कंपनीत इंटरनशिप व प्रीप्लेसमेंटसाठी देखील ऑफर मिळाली आहे.
व्होरपार्किंग ही जर्मनीस्थित आंतरराष्ट्रीय कंपनी आहे जगभरातील कार पार्किंग सिस्टीमची आघाडीची निर्माती असून भारतामध्ये या कंपनीचे कार्यालय पुणे येथे आहे. ही कपंनी पार्किंग व्यवस्था डिझाईन व स्थापित करते. या कंपनीने कॉम्बीलिफट, पझल पार्किंग, पार्कसेफ व लेवल पार्किंग सिस्टीम बाजारात आणल्या आहेत. सध्या पार्किंग व्यवस्थेची गरज ओळखून पार्किंगसंदर्भात तंत्रज्ञान तसेच टेस्टींग आणि व्यवस्थापन यासारख्या सेवा पुरवते.
महाविद्यालयास युजीसी व शिवाजी विद्यापीठाकडून अधिकारप्रदत्त (एम्पॉवर्ड ऍटोनोमॉस) दर्जा मिळाल्यामुळे त्याचा चांगला परिणाम शैक्षणिक अभ्यासक्रम तयार करताना होत आहे. तसेच डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील माजी विद्यार्थी व इंडस्ट्री यांचे चांगले हितसंबध असल्यामुळे डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील प्लेसमेंट हे उत्तम होत आहेत.
सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्योगविश्वाला आंतरविद्याशाखीय (interdisciplinary) प्रकल्पांवर काम करु शकतील अशा अभियंत्यांची गरज आहे. त्या अनुशंगाने व उद्योगविश्वाची गरज लक्षात घेवून डीकेटीई मध्ये अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाचा समावेश केला गेला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांची विविध कंपन्यामध्ये निवड होण्यास मदत होत आहे.
या यशाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व ट्रस्टींनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्र. संचालिका प्रा.डॉ.एल.एस.अडमुठे,उपसंचालक डॉ.यु.जे. पाटील, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ.व्ही.आर. नाईक, टीपीओ जी.एस. जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.