no images were found
नाले सफाईच्या कामाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी
कोल्हापूर : प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज दुपारी नालेसफाईच्या कामाची फिरती करून पाहणी केली. यावेळी त्यांनी जयंती पंपिंग स्टेशन, सुतार वाडा, गाडी अड्डा, रिलायन्स मॉल या चार ठिकाणी करण्यात आलेल्या नालेसफाईची पाहणी केली. याठिकाणी आरोग्य विभागामार्फत नाले सफाईची कामे चांगल्या प्रकारे झाले असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांना उर्वरीत नाले सफाई लवकरात लवकर पूर्ण करुन घेण्याच्या सूचना दिल्या. यासाठी आणखीन मशनरी ची आवश्यकता भासल्यास त्या तातडीने घेण्याच्या सूचना दिल्या.
नाले सफाई करुन आजअखेर 1029 इतका डंपर गाळ काढून तो उठाव करण्यात आलेला आहे. जयंती नाल्याची एकूण 17 किलोमीटर लांबीचा आहे. याममधील 10 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्याचबरोबर गोमतीनाला 7.5 किलोमीटर लांबीचा असून यामधील 7 किलोमीटरचे काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित राहिलेला काम 30 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांना दिल्या. नाले सफाईतून आजअखेर सुतार वाडा या ठिकाणाहून 833 टन गाळ उठाव करण्यात आला आहे. तर रिलायन्स मॉल येथे 670 टन, गाडीअड्डा येथून 1524 टन, जयंती पंपिंग स्टेशन येथून 180 टन गाळ उठाव करण्यात आलेला आहे. तसेच वाय पी पवारनगर येथून 110 टन, मनोरा हॉटेल येथून 1483 टन गाळ उठाव करण्यात आलेला आहे. तर सुतारवाडा येथून 75 टन फ्लोटिंग मटेरियल उठाव करण्यात आलेले आहे. या सर्व ठिकाणचा आजअखेर 4875 टन गाळ काढून तो उठाव करण्यात आलेला आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, जल अभियंता हर्षजित घाडगे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, आरोग्य निरीक्षक स्वप्निल उलपे उपस्थित होते.