Home मनोरंजन इफ्फीसाठी निवडलेल्या ‘पल्याड’ चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर प्रदर्शित

इफ्फीसाठी निवडलेल्या ‘पल्याड’ चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर प्रदर्शित

0 second read
0
0
311

no images were found

इफ्फीसाठी निवडलेल्या पल्याडचित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर प्रदर्शित

काही चित्रपट प्रदर्शनापूर्वीच मोठमोठी शिखरं सर करत इतिहास रचतात. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांचे मानकरी ठरल्यानंतर रसिकांच्या सेवेत रुजू होतात. प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या ‘पल्याड’ या आगामी मराठी चित्रपटानंही अशाच प्रकारे इतिहास रचत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यापूर्वीची आपली नेत्रदीपक वाटचाल सुरू ठेवली आहे. जागतिक पातळीवरील आघाडीच्या फोर्ब्स मासिकानंही दखल घ्यावी इतका मोठा बहुमान पटकावत ‘पल्याड’नं मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. नुकतीच ‘पल्याड’ चित्रपटाची गोव्यात होणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियासाठी (इफ्फी) निवड करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. याच सकारात्मक आणि जल्लोषमय वातावरणात ‘पल्याड’चा दिमाखदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ट्रेलरचं प्रचंड कौतुक होत असून, प्रेक्षकांच्या मनात कुतूहल जागवणारा ‘पल्याड’च्या ट्रेलरची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

४ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ‘पल्याड’ची निर्मिती चंद्रपुरातील व्हिजनरी व्यावसायिक व निर्माते पवन सादमवार, सुरज सादमवार, मंगेश दुपारे, प्रणोती पांचाळ आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी एलिवेट फिल्म्स व एलिवेट लाईफ आणि लावण्य प्रिया आर्टसच्या बॅनरखाली केली आहे. के सेरा सेरा डिस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन शैलेश दुपारे यांनी केलं आहे.

‘पल्याड’ची कथा सुदर्शन खडांगळे यांनी लिहिली असून, सुदर्शन खडांगळे आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी पटकथा व संवादलेखन केले आहे. मुख्य सहाय्यक दिग्दर्शक गीतेश नीमजे आहेत.  इफ्फी गोव्यामध्ये निवड होण्यापूर्वी आजवर जवळपास १४ चित्रपट महोत्सवांमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या ‘पल्याड’मध्ये शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, बल्लारशहा मधील बाल कलाकार रुचित निनावे, देवेंद्र दोडके, वीरा साथीदार, सचिन गिरी, गजेश कांबळे, सायली देठे, भारत रंगारी, बबिता उइके, रवी धकाते, राजू आवळे आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. कलाकारांना अचूक वेशभूषा करण्याचं काम विकास चहारे यांनी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात २५ दिवसांमध्ये या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण पूर्ण करण्यात आलं आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…