
no images were found
बालक, नवमातांच्या आरोग्यासाठी रेकिट–प्लॅन इंडिया भागीदारी
दिल्ली : ग्राहक आरोग्य आणि स्वच्छतेतील जागतिक ब्रँड असलेल्या ‘रेकिट’ने नवमाता आणि ५ वर्षांखालील मुलांच्या आरोग्यासाठी ‘प्लॅन इंडिया’शी भागीदारीची घोषणा केली आहे. गुजरातमधील भावनगर आणि गीर सोमनाथ, महाराष्ट्रातील धुळे आणि वाशीम, राजस्थानमधील राजसमंद येथील माता आणि बालकांचे आरोग्य सुधारण्यावर या उपक्रमाद्वारे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
‘स्वत:ची काळजी’ याबाबत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या व्याख्येनुसार हा उपक्रम व्यक्ती, कुटुंबे आणि समुदायांच्या आरोग्याला चालना देण्यासाठी, आजार रोखण्यासाठी आणित्यांचेव्यवस्थापनकरण्यासचालनादेतो.नवमातांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्य ठेवण्याबरोबरच आरोग्य हा मूलभूत अधिकार असल्याच्या पार्श्वभूमीवर बालपणाच्या विकासामध्ये ‘स्वत:ची काळजी’ अंतर्भूत करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील नवमातांना पारंपारिक पथनाट्ये, विविध शैक्षणिक उपक्रम आणि घरोघरी भेट देणे यासारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे गुंतवून ठेवले जाते. ज्यामुळे आरोग्यविषयक महत्त्वाची माहिती आणि सेवा त्यांच्या दारापर्यंत पोहोचतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी आरोग्य’ या वचनबद्धतेच्या अनुषंगाने स्व-काळजी आणि आरोग्य शिक्षणाचे फायदे प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याची खात्री हा उपक्रम देतो. तसेच कार्यक्रमाची व्यापक पोहोच माता आणि काळजीवाहकांना सक्षम बनविण्यात मदत करते, ज्यामुळे त्यांना स्वतःच्या आणि त्यांच्या मुलांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यास सक्षम केले जाते.
सुरुवातीला ‘प्रत्येक मुलापर्यंत पोहोचा’ (रीच इच चाईल्ड) अशी ओळख असलेला हा उपक्रम महाराष्ट्रातील नंदुरबार आणि अमरावती, राजस्थानमधील राजसमंद आणि गुजरातमधील गीर आणि भावनगर या पाच जिल्ह्यांतील २६८ हून अधिक गावांमध्ये पोहोचला. गेल्या वर्षी सुरुवात झाल्यापासून हा उपक्रम पाच वर्षांखालील ७० हजारहून अधिक मुलांपर्यंत आणि ४० लाख मातांपर्यंत पोहोचला आहे. आता १ कोटी मातांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
– ‘गुलाबी दीदीं’सह स्थानिक समुदायांचे सक्षमीकरण
‘नवमाता आणि ५ वर्षांखालील मुलांची सेल्फ केअर” या उपक्रमात ‘गुलाबी दीदी’ या स्थानिक महिलांच्या कौशल्याचा लाभ घेता येतो. या गुलाबी दीदींना आरोग्यविषयक ज्ञानाचा प्रसार करण्याबरोबरच सामुदायिक आरोग्य कर्मचारी म्हणून प्रशिक्षित केले जाते. हा कार्यक्रम थेट घरांमध्ये राबवला जातो. संपूर्ण प्रदेशातील प्रत्येक नवमाता आणि मुलाला सर्वसमावेशक स्वयं-काळजीचे शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रीत केले जाते. यात कोणालाही मागे ठेवले जात नाही.
‘गुलाबी दीदी’ युवतींना समुपदेशनाद्वारे शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. स्वच्छता आणि आरोग्य, प्रसवपूर्व तपासणी, जन्म अंतर, योग आणि मानसिक आरोग्य, अन्न आणि आरोग्य आणि जन्मजात रोग आदींबद्दल समुपदेशन केले जाते. तसेच निरोगी आहार राखणे, शारीरिकरित्या सक्रिय असणे, लसीकरण करणे, तंबाखूचे सेवन टाळणे, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी तणावाचे व्यवस्थापन करणे, चांगल्या आरोग्याचा सराव करणे, आरोग्याची नियमित तपासणी करणे, स्तनपान करणे आणि जन्मातील अंतर अशा विविध विषयांवरही समुपदेशन केले जाते.