
no images were found
गाळेधारकांच्या दंडव्याजामध्ये 30 टक्के सवलत योजना
कोल्हापूर : महानगरपालिका मालकीचे दुकानगाळे, खुल्या जागा, केबीन, यांचे भाडेनिश्चितीकामी राज्य शासनाचे दि.06 नोंव्हेबर 2023 चे अधिसुचनेप्रमाणे महापालिकेच्यावतीने तीन टप्यात सवलत योजना जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये महानगरपालिका मालकीचे दुकानगाळे, खुल्या जागा, केबीन यांचे सन 2015-16 ते सन 2023-24 या कालावधीमधील भाडे निश्चितीकरण दंडव्याजामध्ये सवलत योजना राबविण्यात आलेली आहे. यामध्ये दि.15 मार्च 2024 ते 14 एप्रिल 2024 या एक महिन्याच्या कालावधीसाठी गाळेधारकांनी एक रकमी रक्कम भरल्यास दंडव्याज रक्कमेत 50 टक्के सवलत योजना जाहिर करण्यात आली होती. यानंतर सोमवार, दि.15 एप्रिल 2024 ते मंगळवार, दि.14 मे 2024 या एक महिना कालावधीमध्ये गाळेधारकांनी एक रक्कमी रक्कम भरलेस दंडव्याजामध्ये 40 टक्के सवलत देण्यात आली होती. तर दि.15 मे 2024 ते 14 जून 2024 अखेर 30 टक्के सवलत योजना देण्यात येणार आहे.
50 टक्के सवलत योजनेमधून 388 गाळेधारक व खुलीजागाधारक यांनी लाभ घेतला असून यामध्ये रु.5,61,06,589/- इतकी रक्कम महानगरपालिकेस जमा झालेली आहे. तर दुस-या टप्यात 40 टक्के सवलत योजनेमधून रु.1 कोटी 27 लाख 44 हजार 140 रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे. या योजनेस गाळे व खुली जागाधारक यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या 40 टक्के सवलतीची मुदत ही दि.14 मे 2024 अखेर असल्याने या सवलत योजनेचे शेवटचे 6 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. यानंतर दि. 15 मे ते दि.14 जून 2024 या एक महिना कालावधीसाठी एक रक्कमी रक्कम भरलेस दंडव्याज रक्कमेत 30 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तरी उर्वरित सर्व गाळेधारकांनी व खुल्या जागाधारकांनी या सवलत योजनेचा लाभ घेऊन आपली थकीत भाडे रक्कम भरुन महापालिकेस सहकार्य करावे व गाळे सिलबंद करणे यासारखे कारवाईचे कटू प्रसंग टाळावेत असे आवाहन महानगरपालिकेच्या इस्टेट विभागामार्फत करण्यात आले आहे.