
no images were found
ताण वाढला: पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत दिलीपला वाटणाऱ्या ईर्ष्येमुळे त्याचे पुष्पाशी असलेले नाते धोक्यात आले
सोनी सब वाहिनीवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत अनेक आव्हानांना हिंमतीने तोंड देऊनही नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या पुष्पा (करुणा पांडे)च्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. अलीकडच्या भागात प्रेक्षकांनी पाहिले की, दिलीप (जयेश मोरे)ला जुगल (अंशुल त्रिवेदी) विषयी प्रचंड ईर्ष्या वाटते कारण पुष्पाचे त्याच्याशी जवळकीचे, मैत्रीचे नाते आहे आणि त्याच्या तुलनेत तिचे आपल्याकडे दुर्लक्ष होते, असे त्याला वाटते. त्यात संतोष (अमित श्रीकांत सिंह) आगीत तेल ओतण्याचे काम करतो आणि जयेशचे कान भरतो. पुष्पाशी असलेले त्याचे वैवाहिक नाते आणि त्यांच्या कुटुंबासाठी जुगल एक धोका ठरू शकतो असे तो दिलीपला पटवून देतो. परिणामी, दिलीपच्या मनात द्वन्द्व सुरू आहे. त्याच्या मनातील असुरक्षितता आणि पुष्पा व आपल्या मुलांबद्दलचे प्रेम या भावनांमध्ये संघर्ष चालू आहे.
पुष्पा आणि जुगलच्या घनिष्ठ मैत्रीचा दिलीपला दिवसेंदिवस जास्त त्रास होऊ लागला आहे. बापोदराच्या आगामी घोषणेबद्दलचा त्यांचा उत्साह पाहून तो आणखीनच चिंतेत पडला आहे. पुष्पा आणि जुगलच्या नात्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होणार आहे, याची चिंता त्याला खात आहे. त्याच्या या चिंतेमुळे पुष्पावर पुन्हा काही कठीण प्रसंग तर ओढावणार नाही ना, अशी काळजी प्रेक्षकांना वाटू लागली आहे. दिलीप काय करेल? दिलीपच्या मनातील भीतीमुळे पुष्पापुढे काही अडचणी येणार का?
दिलीपची भूमिका करणारा जयेश मोरे म्हणतो, “दिलीप पुष्पाचा विश्वास संपादन करण्यासाठी कसून प्रयत्न करत आहे. त्याला आपले विस्कळित झालेले कुटुंब पुन्हा एकत्र आणायचे आहे. मनाचा हा निर्धार झालेला असला तरी पुष्पाचे जुगलशी असलेले जवळकीचे नाते पाहून तो अस्वस्थ होतो. त्यांच्यातील घनिष्ठ मैत्री दिलीपच्या मनातील संतापाचे कारण बनते आणि त्यातून प्रचंड ईर्ष्या आणि अढी निर्माण होते. हळूहळू ही असुरक्षितता वाढत जाते आणि तो तणाव दिलीपसाठी असह्य होतो. आणि स्वतःची असुरक्षितता दूर करण्यासाठी तो पुष्पाच्या जीवनात अडचणी उभ्या करण्याचा प्रयत्न करतो.”