Home राजकीय PM मोदींकडून शरद पवार, उद्धव ठाकरेंना जाहीर ऑफर; पवारांकडून लगेचच प्रत्युत्तर

PM मोदींकडून शरद पवार, उद्धव ठाकरेंना जाहीर ऑफर; पवारांकडून लगेचच प्रत्युत्तर

1 second read
0
0
43

no images were found

PM मोदींकडून शरद पवार, उद्धव ठाकरेंना जाहीर ऑफर; पवारांकडून लगेचच प्रत्युत्तर

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत जाण्यापेक्षा, काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत यावं, अशी थेट ऑफर नंदुरबारच्या सभेत बोलत असताना  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.

‘महाराष्ट्रातील एक दिग्गज नेते ४० ते ५० वर्षांपासून राजकारणात आहेत. बारामतीमधील निवडणुकीनंतर ते इतके चिंताग्रस्त आहेत की त्यांनी एक विधान केलंय. बऱ्याच लोकांशी सल्लामसलत करुनच त्यांनी हे विधान केलं असावं. ते इतके हताश, निराश झालेत की त्यांना असं वाटतंय की ४ जूननंतर सार्वजनिक आयुष्यात, राजकीय आयुष्यात टिकून राहायचं असेल तर लहान लहान राजकीय पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल. याचा अर्थ नकली राष्ट्रवादी, नकली शिवसेनेनं काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी मनाची तयारी केलेली आहे. ४ जूननंतर काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा छातीठोकपणे आमच्या अजित पवार, एकनाथ शिंदेंकडे या. तुमची स्वप्नं पूर्ण होतील,’ अशी थेट ऑफर मोदींनी दिली.

देशातील संसदीय लोकशाही मोदींमुळे संकटात आली असल्याची टीका शरद पवारांनी केली. ज्यांच्यामुळे देशातील लोकशाही संकटा आली. जनमत त्यांच्या विरोधात आहे. त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही. आम्ही नेहरु, गांधी यांची विचारसरणी मानणारे आहोत. त्यामुळे भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असं शरद पवार म्हणाले. ‘दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकण्यात आलं. या कारवाईमागे केंद्र सरकार आहे. त्यांच्या सहभागाशिवाय हे होऊ शकत नाही. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांच्यासोबत आम्ही कधीही जाणार नाही. मोदी करत असलेली विधानं देशाच्या ऐक्याच्या दृष्टीनं घातक आहेत. त्यांचा विचार देशासाठी घातक आहेत. अशांसोबत आम्ही जाऊ शकत नाही,’ असं पवारांनी पुढे सांगितलं.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक      …