
no images were found
शाहू महाराजांना स्मृतिदिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात अभिवादन
कोल्हापूर(प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आज त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्रामध्ये आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या भव्य तैलचित्रास कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून तसेच मान्यवरांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगीम ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. देविकाराणी पाटील, अविनाश भाले, डॉ. किशोर खिलारे, सचिन घोरपडे, शरद पाटील आदी उपस्थित होते