
no images were found
शिवाजी विद्यापीठात ‘अखईं ते जालें’ ग्रंथावर मुक्त संवाद
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्या वतीने गुरूवार दि. ९ मे २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता मराठी विभागात संत साहित्याचे अभ्यासक, येथील प्रा. समीर चव्हाण (आयआयटी कानपूर, उत्तरप्रेदश) यांच्याशी मुक्त संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रा. चव्हाण लिखित अखईं ते जालें तुकारामः हिंदुस्तानी परिवेशात खंड एक आणि दोन या ग्रंथाची निर्मितीप्रक्रिया आणि संत तुकारामांच्या अभंगाची विविध निरूपणे या विषयावर प्रा. समीर चव्हाण यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. या कार्यक्रमास म्हणून प्रा. प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) आणि प्रा. रणधीर शिंदे (कोल्हापूर) प्रमुख उपस्थित असणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक प्रा. नंदकुमार मोरे यांनी केले आहे.