
no images were found
महापालिकेच्यावतीने राजर्षी शाहू महाराज यांना आदरांजली
कोल्हापूर :- राजर्षी छ.शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिकेच्यावतीने आज सिध्दार्थ नगर नर्सरी बाग येथील राजर्षी छ.शाहू महाराज समाधी स्थळ, दसरा चौक येथील राजर्षी छ.शाहू महाराज यांच्या पुतळयास अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदराजंली वाहिली. यावेळी उपशहर अभियंता सतिष फप्पे, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, सुनिल गेजगे, कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.