Home शासकीय कोल्हापूरात ५ लाख ग्राहकांसाठी प्रीपेड वीज मीटर बसणार

कोल्हापूरात ५ लाख ग्राहकांसाठी प्रीपेड वीज मीटर बसणार

1 second read
0
1
88

no images were found

कोल्हापूरात ५ लाख ग्राहकांसाठी प्रीपेड वीज मीटर बसणार

कोल्हापूर : जिल्ह्यातील 11 लाख 80 ग्राहकांपैकी 5 लाख 4 हजार ग्राहकांना सुधारित वितरण क्षेत्र योजनेतून महावितरणतर्फे प्रीपेड वीज मीटर बसविण्यात येणार आहेत. या नव्या संकल्पनेत महावितरण ‘रिचार्ज करा, वीज वापरा’ असा नवा पर्याय कार्यान्वित करीत आहे. या मीटरसाठी राज्यात एक हजार कोटी रुपयांची निविदा काढण्यात आलेली आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका, वडगाव, जयसिंगपूर, कागल, गडहिंग्लज, मलकापूर, पन्हाळा, कुरूंदवाड, मुरगूड नगरपालिका, नगरपरिषद हद्दीतील सर्व वर्गवारीतील ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याचे नियोजन आहे.

महावितरणच्या मीटर रीडिंग आणि बिल वसुलीवर प्रशासनाने सध्या अधिक लक्ष केंद्रित केले असून याचाच भाग म्हणून आता प्रीपेड वीज मिटर बसविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. ग्राहकांना प्रीपेड वीज मीटर बसवून अचूक वीज वापर आणि अ‍ॅडव्हान्स बिल वसुलीवर भर दिला जाईल. नव्या धोरणानुसार वाणिज्य, औद्योगिक, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा, यंत्रमाग या वर्गवारीतील सर्व ग्राहकांना असे मीटर बसविण्यात येणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…