no images were found
समर वेरमानी आणि यश पंडितने घेतले अॅक्शन हीरोचे रूप
सोनी सबवरील ‘आंगन – अपनों का’ एक हृदयस्पर्शी कौटुंबिक मालिका आहे, ज्यामध्ये जयदेव शर्मा (महेश ठाकूर) आणि त्याच्या तीन मुली पल्लवी (आयुषी खुराना), तन्वी (अदिती राठोड) आणि दीपिका (नीता शेट्टी) यांची कहाणी आहे. अलीकडच्या भागांमध्ये हे कौटुंबिक नाट्य अॅक्शन-पॅकड् नाट्यात रूपांतरित झाले होते, जेव्हा जयदेवचे दोन जावई आकाश (समर वेरमानी) आणि राकेश (यश पंडित) यांनी पप्पी मेहरा (अश्विनी कौशल)च्या भाडोत्री गुंडांशी दोन हात केले. हे दृश्य जबरदस्त अॅक्शनने भरलेले होते, त्यामुळे या दोन्ही अभिनेत्यांना त्यांच्या नेहमीच्या सामान्य नायकापेक्षा वेगळे बनून अॅक्शन हीरो साकारण्याची संधी मिळाली.
आकाश अवस्थीची भूमिका करत असलेला समर वेरमानी म्हणतो, “मला खरोखर असे वाटते की, फाइटिंगची दृश्ये चित्रित करणे सगळ्यात कठीण असते. कारण, एक तर त्यासाठी खूप सराव करावा लागतो आणि दुसरे म्हणजे, सगळे सुरक्षा प्रोटोकॉल सांभाळणे यात गरजेचे असते. अशी दृश्ये चित्रित करण्यासाठी बराच वेळ लागतो, कारण त्यात योग्य कोरिओग्राफी, यथोचित ठोसे आणि मारामारीत सामील असलेल्या प्रत्येकाची सुरक्षा या गोष्टींची काळजी घ्यावी लागते.”
अशी सगळी आव्हाने असली, तरी समर रोमांचित, उत्साहित होता. बॉलीवूड अॅक्शन दृश्यांमधून प्रेरणा घेण्याबाबत तो म्हणाला, “माझा सह-कलाकार राकेश (यश पंडित) याच्या सोबतीने मारामारी करायची असल्याने हा आणखी वेगळाच अनुभव होता. त्याच्यासोबत हे दृश्य करताना मला खूप मजा आली, कारण, त्याने दक्षिणेतील चित्रपटातून प्रेरणा घेतली होती! माझी एंट्री खालच्या कोनातून शूट करावी असे मत देण्यापासून ते स्वतःच्या हालचाली कोरिओग्राफ करण्यापर्यंत राकेशने सूत्रे हाती घेतली होती. हे दृश्य करताना आम्हाला खूपच मजा आली. आमच्या फाइट मास्टरने आम्हाला जे शिकवले ते अनुसरण्याचा मी प्रयत्न केला, पण राकेश मात्र स्वतःच्या कल्पनेने काम करत होता.”
राकेशची भूमिका करणारा यश पंडित म्हणतो, “माझे स्टंट आणि फाइटिंगची दृश्ये मला स्वतःला करायला फार आवडते. अॅक्शनमध्ये असे काही तरी असते, जे मला फार भावते. या अगोदर शाम कौशल सरांबरोबर मी अॅक्शन दृश्ये असलेल्या चित्रपटांत काम केले आहे. त्यामुळे स्वतंत्रपणे आव्हान पेलायला मला आवडते. ‘आंगन’साठी मी आमच्या अॅक्शन मास्टर कडून योग्य ती अनुमती घेतली आणि माझ्याकडून काही सूचन देखील केले. काही दृश्यांमध्ये माझी स्वतःची शैली दाखल करण्याची सूट मागितली. विशिष्ट प्रकारे ठोसा मारणे किंवा आकाशचा जीव वाचवण्यासाठी काही विशिष्ट एंट्री करणे वगैरे गोष्टी सुचवल्या. अॅक्शन दृश्ये अकृत्रिम वाटली पाहिजेत. आमच्या टीमचे अभिनंदन की, कुणालाही दुखापत झाली नाही आणि दृश्य छान साकारले.”