no images were found
मनोज वाजपेयी यांचा नंद घर मोहिमेत सहभाग
मुंबई, : भारतभरातील १४ लाख अंगणवाड्यांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने चालवण्यात येणाऱ्या नंद घरमध्ये राष्ट्रीय मोहीम सुरु करण्यात आली आहे – अगर बचपन से पूछा खाना खाया तो देश का कल बनाया. अभिनेता मनोज वाजपेयी यांचा नंद घरच्या राष्ट्रीय मोहिमेत सहभाग असणार आहे. भारताच्या भविष्यातील पिढीला दर्जेदार पोषण मिळावे, त्यांची सर्वसमावेशक आरोग्य देखभाल केली जावे व मुलांना सर्वोत्तम प्रीस्कुल शिक्षण मिळावे हा नंद घरचा उद्देश आहे.
या मोहिमेमध्ये मनोज वाजपेयी यांचे स्वागत करताना, वेदांताचे चेयरमन श्री अनिल अगरवाल यांनी सांगितले, “नंद घर ही राष्ट्रीय मोहीम आरोग्य आणि पोषणावर भर देत मुले व महिलांचे एकंदरीत कल्याण साधले जावे यासाठी साहाय्य करते. मोहिमेचा सातत्याने विस्तार होत असून, मनोज वाजपेयी जी यामध्ये सहभागी होत आहेत ही अतिशय आनंदाची बाब आहे. त्यांची स्वतःची जीवनगाथा आणि आपल्या भविष्यातील पिढ्यांना पोषण प्रदान करून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याच्या नंद घरच्या उद्देशात भरपूर साम्य आहे.”
आज या मोहिमेची सुरुवात करण्यात आली, त्यावेळी मनोज वाजपेयी यांनी युवा थिएटर अभिनेत्यापासून आजपर्यंतचा प्रवास वर्णन केला, अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असताना नियमितपणे पोषक आहार मिळावा यासाठी मित्रांकडून मौल्यवान साहाय्य दिले गेले हे देखील त्यांनी आवर्जून सांगितले. अभिनेत्याला किती संघर्ष करावा लागतो ते सांगताना वाजपेयी म्हणाले की, स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडण्याची शक्ती भरल्या पोटी व पोषक आहारामुळे मिळते. www.nandghar.org या वेबसाईटला भेट देऊन लोकांनी आपला पाठिंबा दर्शवावा, दान करून, स्वयंसेवा करून नंद घरला सहयोग प्रदान करावा असे आवाहन त्यांनी केले.
नंद घरसोबत आपल्या संबंधांविषयी मनोज वाजपेयी म्हणाले, “पोटातली भूक काय असते हे माहिती असल्याने त्या भुकेचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रभाव किती तीव्र असू शकतो ते मला चांगलेच ठाऊक आहे. म्हणूनच नंद घर सारखे उपक्रम खूप महत्त्वाचे आहेत. या उपक्रमामुळे मुलांना सुयोग्य पोषण मिळते, शिवाय अधिक उज्वल भवितव्यासाठी आशा आणि संधी निर्माण करण्याचे काम देखील या उपक्रमामध्ये केले जाते. मुलांच्या क्षमतांना पोषणाचे बळ मिळावे यासाठी नंद घर मोहिमेसोबत हातमिळवणी करू या आणि आपण सर्वजण मिळून अधिक उज्वल भारत निर्माण करू या.”
मॅककॅन वर्ल्डग्रुप इंडियाचे सीईओ आणि सीसीओ व आशिया पॅसिफिकचे चेयरमन श्री प्रसून जोशी यांनी सांगितले, “मुलांना आपल्या खऱ्या क्षमतांचा वापर करता यावा यासाठी संधी द्यायच्या असतील तर सर्वसमावेशक पोषण पुरवणे गरजेचे आहे. ही बाब अधोरेखित करण्यासाठी आपल्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडीअडचणी ज्यांनी सहज केल्या आहेत अशा भारताच्या सर्वात लोकप्रिय मुलामुलींना पुढे आणणे हा सर्वात योग्य मार्ग आहे असे आम्हाला वाटते.”
नंद घर हा अनिल अगरवाल फाउंडेशनचा प्रमुख प्रकल्प आहे. एकाही मुलाला उपाशीपोटी झोपावे लागू नये हे फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प प्रयत्नशील आहे. भारतातील १४ राज्यांमध्ये नंद घरमध्ये प्रीस्कुल विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवून कुपोषण स्तर कमी करण्यात यश मिळवून नंद घरने एक महत्त्वाचा टप्पा पार केला. गेल्या वर्षी अनिल अगरवाल फाउंडेशनने मल्टी मिलेट न्यूट्री बार तयार केले आहेत जे सध्या वाराणसीमध्ये १३६४ अंगणवाड्यांमध्ये ३ ते ६ वर्षे वयोगटातील ५०,००० मुलांना दररोज वाटले जातात. या बारमध्ये प्रथिने, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असून त्यामुळे मुलांचे पोषण सेवन सुधारले आहे तसेच शाळेतील अनुपस्थिती देखील कमी झाली आहे.
#KhanaKhayaKya मोहिमेमध्ये सहभागी होऊन, नागरिकांनी व समविचारी व्यक्तींनी परिवर्तनाच्या वाटचालीत सहभागी व्हावे असे आवाहन नंद घरने केले आहे. आपल्या राष्ट्रासाठी अधिक चांगले भविष्य निर्माण करण्याचा मार्ग ही मोहीम खुला करत आहे.