Home शासकीय महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत मतदान जनजागृतीसाठी पथनाट्याद्वारे मतदारांचे प्रबोधन

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत मतदान जनजागृतीसाठी पथनाट्याद्वारे मतदारांचे प्रबोधन

24 second read
0
0
23

no images were found

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत मतदान जनजागृतीसाठी पथनाट्याद्वारे मतदारांचे प्रबोधन

कोल्हापूर  : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका मार्फत विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीद्वारे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पथनाट्याद्वारे शहरातील मुख्य चौकात प्रबोधन करण्यात येत आहे.

            निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे व प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या संकल्पनेतून शहरातील 276 उत्तर विधानसभा मतदारसंघ व 274 दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भागात जनजागृती केली जात आहे. आतापर्यंत सानेगुरुजी वसाहत, साळोखेनगर , सुभाषनगर, जवाहरनगर , क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, जाधववाडी, रिंगरोड फुलेवाडी, रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क बसस्टँड, ताराबाई पार्क, सदर बाजार, पद्मा पथक लाईन बाजार, प्रतिभानगर, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, टाकाळा, साईक्स एक्सटेन्शन, लक्ष्मीपुरी, गंगावेश, अर्धा शिवाजी पुतळा, बिंदू चौक, महाराणा प्रताप चौक, महानगरपालिका मुख्य इमारत या ठिकाणी पथनाट्य सादर करुन नागरीकांचे प्रबोधन करण्यात येतआहे.

            महानगरपालिका क्षेत्रातील महापालिका व खाजगी शाळातील शिक्षक आणि शिक्षिका यांचा या पथनाटयामध्ये सहभाग आहे. या पथनाट्यात मतदानासाठी दिव्यांग, वयस्कर, तृतीयपंथी मतदारांना देण्यात येणा-या विशेष सुविधा, मतदानाचे महत्त्व, लोकशाही हा एक सण आहे, मतदान करताना उमेदवारा व्यतिरिक्त नोटा बटन बाबत माहिती देणे, गृहिणी, शेतकरी, कामगार यांना मतदान बाबतचे महत्त्व, 7 मे 2024 मतदानासाठी सुट्टी देण्यात आलेली आहे. ही सुट्टी मनोरंजनासाठी नसून प्रथम मतदानाला प्राधान्य देण्याकरिता आहे, मतदान केंद्राची माहिती मिळणे करता ॲपचा वापर याबाबतचे महत्त्व व माहिती या पथनाट्य निर्मितीत करण्यात आली आहे.

            या पथनाट्याचे लेखन दिग्दर्शन प्रभाकर लोखंडे यांनी केले. तर प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी व स्वीप नोडल अधिकारी शंकर यादव, जिल्हा स्काऊट आणि गाईडच्या जिल्हा संघटक राजेंद्र कोरे यांचे यासाठी विशेष मार्गदर्शन लाभत आहे. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी आनंद आकुर्डेकर, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव यांनी हे पथनाटय सादर करणेसाठी विशेष परिश्रम घेतले आहे. 276 उत्तर मतदारसंघातील पथनाट्यामध्ये विलास पवार, संतोष कदम, कुमार पाटील, युवराज गायकवाड,तानाजी दराडे, दिपक कुंभार, सुरेंद्र बडद, शिवशंभू गाटे, संतोष आंबेकर, किशोर शिनगारे, संतोष मोरमारे, पिंटू नाईक, वैशाली उलपे, माधवी शिनगारे, गीता घाटगे, मोसमी निकम, चारुशीला बिडवे, कविता रावळ व 274 पश्चिम मतदारसंघ पथनाट्यामध्ये प्रभाकर लोखंडे, राजेंद्र कोरे, विठ्ठल देवणे, आनंदराव  लोखडे, रविंद्र नाईक, विक्रमसिंह भोसले, नामदेव वाघ, प्रकाश गावडे, धनश्री जोशी, अरुण सुनगार, सारिका पाटील, नयना चौगुले, सायली शेडगे, गिरीजा जोशी, रुपाली मोरे, वंदिता महाडीक या शिक्षकांनी सहभाग घेतला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…