Home शासकीय मुंबईसह महाराष्ट्राला मतदानाच्या टक्केवारीत अग्रस्थानी आणावे -धर्मेंद्र सिंग गंगवार

मुंबईसह महाराष्ट्राला मतदानाच्या टक्केवारीत अग्रस्थानी आणावे -धर्मेंद्र सिंग गंगवार

51 second read
0
0
24

no images were found

मुंबईसह महाराष्ट्राला मतदानाच्या टक्केवारीत अग्रस्थानी आणावे -धर्मेंद्र सिंग गंगवार

            मुंबई,  : महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मतदानाची टक्केवारी वाढवून मतदानात मुंबई उपनगर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रालाही अग्रस्थनी आणावे, असे आवाहन लोकसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले राज्य विशेष निरीक्षक धर्मेंद्रसिंग गंगवार यांनी येथे केले.

            लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शुक्रवार 26 एप्रिल 2024 पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. लोकसभेच्या या चारही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘स्वीप’च्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यमंदिरात मुंबई महानगरपालिकेच्या ‘टी’ विभागांतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, स्वच्छता कर्मचारी, मतदान केंद्रस्तरीय (बीएलओ) आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी ‘क्षमता विकास आणि जीवन बदलण्याची कला’ या विषयावरील २३ व्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

            यावेळी विशेष निरीक्षक श्री. गंगवार बोलत होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, निवडणूक निर्णय अधिकारी दादाराव दातकर, ‘स्वीप’चे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी, तहसीलदार प्रिया जांबळे-पाटील, स्वीपचे सल्लागार भारत मराठे उपस्थित होते.

            विशेष निरीक्षक श्री. गंगवार म्हणाले की, लोकशाहीच्या सक्षमीकरण आणि संवर्धनासाठी मतदारांचे योगदान महत्वाचे आहे. यासाठी आपण सर्वांनी संयुक्तरित्या मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी व मतदाराला मतदान प्रक्रिया आनंददायी वाटेल यासाठी प्रयत्न करावे.

            मतदान प्रक्रिया शांततामय वातावरण, कमी वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने होईल यासाठी मतदान केंद्रांवर आवश्यक मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

रीच वन टीच वन धोरणाचा अवलंब करावा

            राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे. येथे उपस्थित सर्व मतदार दूतांनी मतदारांमध्ये जागृती करावी व त्यांनीही इतरांचे मतदान करण्यासंदर्भात्‍ प्रबोधन करावे या पद्धतीने मतदानाचा टक्का वाढविण्यास मदत होईल. ‘चुनाव का पर्व – देश का गर्व’ हे घोषवाक्य सार्थकी ठरविण्यात आपला सहभाग खूप महत्वाचा आहे. राष्ट्र निर्माणाच्या प्रक्रियेत सर्वांची भागीदारी महत्वाची असून आपण आपली जबाबदारी नक्कीच पार पाडाल, असा विश्वास विशेष पोलीस निरीक्षक एन. के. मिश्रा यांनी यावेळी व्यक्त केला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण &…