Home मनोरंजन भांगडा ते उपशास्त्रीय: वर्ल्ड डान्स डे च्या निमित्ताने सोनी सबचे कलाकार सांगत आहेत, त्यांच्यासाठी डान्सचे महत्व

भांगडा ते उपशास्त्रीय: वर्ल्ड डान्स डे च्या निमित्ताने सोनी सबचे कलाकार सांगत आहेत, त्यांच्यासाठी डान्सचे महत्व

4 second read
0
0
25

no images were found

भांगडा ते उपशास्त्रीय: वर्ल्ड डान्स डे च्या निमित्ताने सोनी सबचे कलाकार सांगत आहेत, त्यांच्यासाठी डान्सचे महत्व

 

वर्ल्ड डान्स डे म्हणजे आंतरराष्ट्रीय नृत्य दिन हा जगभरात दर वर्षी 29 एप्रिल रोजी साजरा केला जातो. एक कला प्रकार म्हणून डान्समधले वैविध्य आणि सौंदर्य साजरे करून त्याची सांस्कृतिक लक्षणीयता अधोरेखित करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. या निमित्ताने डान्सर्स, कोरिओग्राफर्स आणि नृत्य रसिकांनी प्राप्त केलेल्या सिद्धीची दखल घेतली जाते आणि नृत्य वारशाचे जतन आणि त्याचा प्रचार केला जातो. या प्रसंगी, सोनी सबवरील कलाकार शुभेच्छा देत आहेत, आठवणी सांगत आहेत आणि आपल्या जीवनावर आणि कारकिर्दीवर डान्सचा किती सखोल प्रभाव आहे हे सांगत आहेत.

 

सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पाची भूमिका करणारी करुणा पांडे म्हणते,

“लहानपणापासून डान्स हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. माझ्या वडिलांच्या नोकरीमुळे आम्हाला जिथे जिथे राहावे लागले, तेथे मी आधी ही खात्री करून घेत असे की, त्या घरात मला डान्सचा रियाज करण्यासाठी आणि माझ्या म्युझिक सिस्टमसाठी पुरेशी जागा आहे. डान्स मला अपार आनंद देतो, कोणत्याही परिस्थितीत मला शांत ठेवतो आणि आध्यात्मिकतेकडे घेऊन जातो. माझ्या वडीलांच्या सतत होणाऱ्या बदल्यांमुळे माझी जीवनशैली सारखी बदलत असे. पण बॉलीवूडच्या प्रभाव जबरदस्त होता. माझ्या डान्सच्या वेडाला त्यातूनच खत-पाणी मिळाले. प्रत्येकाने नाचले पाहिजे, कारण तो केवळ मनोरंजनाचा एक प्रकार नाही, तर आपल्या भावना अभिव्यक्त करण्याचे ते एक सशक्त माध्यम आहे. डान्सर्सविषयी मला आदर वाटतो आणि कितीही अडचणी असल्या तरी परफॉर्म करण्याची एकही संधी मी सोडत नाही आणि नवीन नवीन शैली शिकत राहते.”

 

सोनी सबवरील ‘आंगन – अपनों का’ मालिकेत पल्लवी शर्माची भूमिका करणारी आयुषी खुराना म्हणते,

“डान्स ही माझी अत्यंत आवडती गोष्ट आहे. मी अगदी लहान होते तेव्हापासून डान्स हा माझ्यासाठी आनंदाचा ठेवा आहे. मी शाळेतल्या कार्यक्रमांत परफॉर्म करत असे, डान्समध्ये मी अनेक बक्षिसे मिळवली. अशाप्रकारे डान्स हा माझा निरंतर सोबती आहे, ज्याच्यामुळे माझ्या जीवनात एक लय आणि लक्षणीयता आहे. मी कोरिओग्राफीच्या क्षेत्रात जाऊ शकले नाही, पण डान्सचे माझे वेड तसेच राहिले. आज वर्ल्ड डान्स डे च्या दिवशी डान्समुळे मिळणारा अपार आनंद आणि त्यातून जन्मणारी स्वप्नं यापुढे मी नतमस्तक आहे.”

 

सोनी सबवरील ‘आंगन – अपनों का’ मालिकेत दीपिकाची भूमिका करणारी नीता शेट्टी म्हणते,

“मला वाटते की, डान्स ही भाव-भावनांची सर्वोत्कृष्ट अभिव्यक्ती असते. मी जेव्हा आनंदी असते, तेव्हा मी पूर्ण जोशात, भान हरपून आणि तल्लीन होऊन नाचते. आणि जेव्हा दुःखाचे ओझे माझ्या मनावर असते, तेव्हा डान्स माझा दिलासा असतो आणि दुःखातून मोकळे होण्यास मला मदत करतो. प्रत्येकाला डान्सच्या माध्यमातून स्वतःमधली ऊर्जा आणि ताकद अनुभवता आली तर काय छान होईल! ही कल्पनाच काय सुंदर आहे! डान्सचे वेड असलेल्या प्रत्येकाला वर्ल्ड डान्स डेच्या शुभेच्छा.”

 

सोनी सबवरील ‘वंशज’ मालिकेत दिग्विजय महाजनची भूमिका करणारा माहिर पांधी म्हणतो,

“मी स्वतः प्रशिक्षित डान्सर नसलो, तरीही एक पंजाबी म्हणून भांगडाच्या ठेक्यावर मी आपोआप थिरकतो! लहानाचा मोठा होत असताना भांगडा हा माझ्यासाठी फक्त डान्स नव्हता; तर भांगडा म्हणजे आपला वारसा, त्याच्या प्रत्येक स्टेपमधून ऊर्जेचा संचार होतो. आज देखील, मी जेव्हा ढोलचा ठेका ऐकतो किंवा एखादे ठेकेदार पंजाबी गाणे ऐकतो तेव्हा स्वतःला आवरू शकत नाही. माझे हात आणि पाय आपसूक तो ठेका पकडतात. या डान्स डे ला आणि पुढे भविष्यात देखील तुम्हा सर्वांचे मन डान्सच्या आनंदाने भरून जावो! आणि भांगडाच्या ठेक्यावर आपण सर्व नेहमीच थिरकत राहू

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…