no images were found
गाझा’साठी गुगलच्या कार्यालयात आंदोलन करणार्या २८ ‘गाझाप्रेमी’ कर्मचार्यांचे निलंबन!
नुकताच ‘इस्रायलसोबतचा करार गुगलने रद्द करावा’ यासाठी गुगलच्या २८ कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन करून थेट गुगलवरच दबाव आणला. या पक्षपाती कर्मचार्यांवर कडक कारवाई करत गुगल आस्थापनाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वांत मोठ्या आस्थापनामध्ये काम करणारे कर्मचारी कामापेक्षा धर्माला अधिक महत्त्व देत असतील आणि साम्यवादी अजेंडा राबवणारे असतील, तर अशा कर्मचार्यांकडून न्यायाची अपेक्षा ठेवू शकत नाही. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी सनातन संस्थेचे धार्मिक पूजा, आरती, नामजप आणि जनप्रबोधन करणारे पाच ॲप ‘गुगल प्ले-स्टोर’वरून हटवण्यात आले होते. यामागेही ‘गाझा’फेम साम्यवादी मानसिकता कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सनातनचे समाज आणि राष्ट्र हितकारी ॲप हटवणार्या गुगलच्या कर्मचार्यांवरही कठोर कारवाई गुगलने करावी, अशी मागणी सनातन संस्थेने केली आहे.
वरकरणी गाझामधील हिंसाचार रोखला जावा अथवा इस्रायलसोबतच्या करारामुळे गाझामध्ये हिंसाचाराला हातभार लागू नये, म्हणून सदर कर्मचारी आंदोलन करत असल्याचे दिसत असले, तरी हिच संवेदनशीलता पाकिस्तान आणि बांग्लादेशात हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचाराच्या वेळी कुठल्या बिळात जाऊन लपते ? इतकेच नव्हे, तर जगभरात गाझाच्या व्यतिरिक्त सुदान, बलुचिस्तान, अफगाणिस्तानसह अनेक ठिकाणी हिंसाचार चालू आहेत. अनेक ठिकाणी मानवता नष्ट केली जात आहे. त्याविषयी गुगलच्या तथाकथित मानवतावादी कर्मचार्यांना आंदोलन का करावे वाटले नाही ? एकूणच इस्रायलच्या निमित्ताने पक्षपाती आणि एकांगी भूमिका घेणारे कर्मचारी समोर आले आहेत.
मध्यंतरी ‘सनातन संस्थे’चे नामजप आणि देवतांच्या आरतीविषयी असलेले ‘सनातन चैतन्यवाणी’, ‘गणेश पूजा आणि आरती’, ‘श्राद्धविधी’, ‘सर्व्हायव्हल गाइड’ (आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काय करावे याबद्दल मार्गदर्शन) आणि ‘सनातन संस्था’ असे पाच ॲप हे गुगल प्ले-स्टोरवरून कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आले आहेत. दंडेलशाहीने वागणार्या गुगलमधील ‘गाझा’फेम मानसिकतेच्या साम्यवादी कर्मचार्यांनी मध्यंतरी ‘भारत मॅट्रोमोनी’, ‘शादी डॉट कॉम’, ‘नौकरी डॉट कॉम’, ‘९९ एकर्स डॉट कॉम’ आदी ॲप हटवले होते; परंतु मोठ्या विरोधानंतर पुन्हा ते ॲप प्ले-स्टोअरवर ठेवण्यात आले. सनातन संस्थेचे हजारो लोकांच्या पसंतीस उतरलेले समाज आणि राष्ट्र हितकारी ॲप गुगल प्ले-स्टोअरवर पुन्हा ठेवण्यात यावेत, अशी आमची मागणी आहे.