no images were found
भगवान महावीर जन्मकल्याणक जलद बुद्धिबळ स्पर्धा
रेंदाळचा श्रीराज भोसले, ठाण्याचा अरविंद अय्यर व इचलकरंजीचा विवान सोनी अजिंक्य ओंकार, ईश्वरी व वरद उपविजेते तर अनिकेत,विक्रमादित व हित तृतीय स्थान
कोल्हापूर :- ताराबाई पार्क येथील मांगल्य मल्टीपर्पज हॉल येथे कोल्हापूरचे अकॅडमीने आयोजित केलेल्या भगवान महावीर जन्मकल्याणक जलद बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.अवकाळी पावसामुळे दिड तास वीज पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे शेवटची फेरी पूर्ण होण्यास विलंब लागला. चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या या स्पर्धेला एज्युअल लाईन्स एज्युकेशनल कन्सल्टंटप्रायव्हेट लिमिटेड हे मुख्य प्रायोजक होते तर कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट,सोसायटी जयसिंगपूर,जितो कोल्हापूर चॅप्टर, चितळे डेअरी भिलवडी व पी.बी.बिल्डर्स कोल्हापूर हे सहप्रायोजक होते.
स्पर्धेच्या अंतिम सातव्या फेरीनंतर खुल्या गटात द्वितीय मानांकित रेंदाळच्या श्रीराज भोसले सहा गुणासह अजिंक्यपद पटकाविले त्याला रोख सात हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.सातवा मानांकित साताराचा ओंकार कडव सहा गुणांसह उपविजेतेपद मिळवले ओंकारला रोख पाच हजार व चषक देऊन गौरविले.श्रीराज व ओंकार या दोघांचे समान सहा गुण झाल्यामुळे सरस बकोल्झ टायब्रेक गुणानुसार श्रीराज अजिंक्य ठरला तर ओंकारला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात अग्रमानांकित ठाण्याचा,अरविंद अय्यरने साडेसहा गुणासह निर्विवाद अजिंक्यपद मिळविले. आठवी मानांकित सांगलीची ईश्वरी जगदाळेसहा गुणांसह सरस बकोल्झ टायब्रेक गुणामुळे उपविजेती ठरली तर तृतीय मानांकित सांगलीचा विक्रमादित्य चव्हाणने सहा गुणांसह तिसरे स्थान राखले.अग्रमानांकित जयसिंगपूरची दिव्या पाटील व बारावी मानांकित सांगलीची सारा हरोले या दोघींना सहा गुणांसह चौथ्या व पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.या पहिल्या पाच क्रमांकांना अनुक्रमे पाच हजार रुपये,तीन हजार रुपये,दोन हजार रुपये,एक हजार रुपये व सातशे रुपये आणि चषक देऊन गौरविले.अकरा वर्षाखालील मुलांच्या गटात अग्रमानांकित इचलकरंजीच्या विवान सोनीने सात पैकी सात गुण मिळवून निर्विवाद अजिंक्य पटकाविले, आठवा मानांकित सांगलीच्या वरद पाटील ने सहा गुणासह उपविजेतेपद मिळविले तर जयसिंगपूरच्या हित बलदवाने साडेपाच गुणासह तृतीय स्थान राखले.बारावा मानांकित सांगलीचा कश्यप खाखरिया व द्वितीय मानांकित कोल्हापूरचा आरव पाटील पाच गुणासह अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान प्राप्त केले.या पहिल्या पाच क्रमांकांना अनुक्रमे पाच हजार रुपये,तीन हजार रुपये,दोन हजार रुपये,एक हजार रुपये व सातशे रुपये आणि चषक देऊन सन्मानित केले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ एज्युअलायन्स एज्युकेशनल कन्सल्टंटचे डायरेक्टर आनंद हंडूर व अमृता हंडूर, महेंद्र ज्वेलर्सचे कुशल ओसवाल,युवा उद्योजक रौनक शहा, दिगंबर जैन बोर्डिंगचे सचिव राकेश निल्ले, सांगलीच्या केपीएस अकॅडमीचे विजय माने व आंतरराष्ट्रीय पंच पोर्णिमा उपळाविकर,आरती मोदी,मनीष मारूलकर यांच्या हस्ते करण्यात आला.आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.स्पर्धा यशस्वी
करण्यासाठी उत्कर्ष लोमटे,रोहित पोळ,किरण शिंदे,धनंजय इनामदार,इमरान बारस्कर, पल्लवी दिवाण, प्रशांत पिसे,कविता पाटील, सचिन हरोले व राहुल डिग्रजे यांनी अथक परिश्रम घेतले.