no images were found
महापालिकेच्यावतीने सिंगल वापर प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात दि.22 एप्रिल 2024 ते दि.25 एप्रिल 2024 याकालावधीमध्ये सिंगल वापर प्लास्टिक बंदीची मोहिम राबवण्यात येणार आहे. शासनाच्या दि. 18 एप्रिल 2024 चे परिपत्रकानुसार सिंगल वापर प्लास्टिक बंदी मोहिमेची प्रशासक के. मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामध्ये शरहातील विभागीय कार्यालय निहाय नियंत्रण अधिकारी, आरोग्य निरिक्षक व कर्मचारी यांची 4 पथके तयार करण्यात आलेले आहे. या तपासणी पथकाला मोहिमेदरम्यान सिंगल प्लास्टिकचा वापर करताना व्यवसाईक अथवा नागरीक आढळलेस संबंधितांवर दंडात्मक व जप्तची कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील रस्त्यावरील विक्रेते, फुल विक्रेते, स्थानिक बाजारपेठ, भाजीपाला मंडई, दुकाने, रेल्वे स्थानक, विमानतळ, बस स्थानक, घाऊक बाजापरेठा, शॉपिंग मॉल्स्, हॉटेल्स, औद्योगिक क्षेत्र तपासणी करण्यात येणार आहे.तरी शहरातील व्यावसाईक व नागरीकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, त्यांनी सिंगल प्लास्टिकचा वापर करु नये अन्यथा सबंधीतांवर दंडात्मक अथवा जप्तीची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य मार्फत करण्यात आले आहे.