no images were found
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक उपक्रम: रददी आणि रोपांच्या बीयांपासून पेन्सिल ची निर्मिती
इचलकरंजी(प्रतिनिधी) : १९ एप्रिलः डीकेटीई येथील प्रथम वर्ष टेक्स्टाईल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांनी प्रा. दिग्विजय म्हामणे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेवर आणि पर्यावरणास हातभार लावण्याच्या उददेशाने वर्तमानपत्राच्या रददीपासून पेन्सिल बनवलेली आहे. वैष्णवी पोरे, श्रध्दा शिंदे, समर्थ रोकडे, रुची तिवारी, श्रेया वाघेला आणि अन्सुल सिंह या विद्यार्थ्यांनी डीकेटीईच्या आयडिया लॅब मध्ये ही नवनिर्मिती साकारली आहे.
या पेन्सिल पासून एक रोप तयार व्हावे म्हणून पेन्सिलच्या शेवटच्या भागात फुलाचे बी लावण्यात आले आहे. पेन्सिलचा वापर झाल्यावर पेन्सिलचा मागील भाग वापरता येत नाही म्हणून तो भाग मातीत रुजवल्यास काही दिवसांनी त्यातून रोपे उगवतील. भविष्यातील पर्यावरणाची गरज ओळखून मुलांच्यावर लहानपनापासूनच वृक्षारोपणाचे संस्कार व्हावेत म्हणून ही संकल्पना डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी समाजासमोर मांडली आहे. यातून आपण होम गार्डनिंग ही संकल्पना वाढीस लावू शकतो.
वर्तमानपत्राचा एकदा वापर झाल्यावर ते रददीत पडून राहतात, त्याचा उत्कृष्ट पध्दतीने उपयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्राद्वारे पेन्सिल तयार करुन काही तरी नविन करण्याची संकल्पना विद्यार्थ्यांना सुचली. या पेन्सिलमध्ये रददीतील वर्तमानपत्रात ग्रॅफाईटची लीड ठेवून गम लावून गुंडाळली जाते. वापर केलेला गम हा लहान मुलांसाठी हानिकारक होवू नये म्हणून खाण्यायोग्य साहित्यापासून हा गम तयार केला आहे. तसेच ही पेन्सिल सर्व सामन्यांंना परवडेल अशा रुपये ४ ते ५ पर्यंतच्या किंमतीत तयार झालेली आहे. तसेच ही पेन्सिल हुबेहुब बाजारामधील उपलब्ध असलेल्या पेन्सिलसारखी असून ही पेन्सिल टिकण्यास दणकट आहे. या पेन्सिलमध्ये लीड चांगली असल्याने या पेन्सिलद्वारे रेखाटलेले चित्र किंवा अक्षरे सुबक येतात. डीकेटीईचे विद्यार्थी नेहमी समाजोपयोगी उपक्रमावर संशोधन करत असतात हा देखील समाजउपयोगी पर्यावरणास हातभार लावणारा शैक्षणिक साहित्यावर अधारित संशोधन आहे.
या पर्यावरणपूरक संशोधनाबददल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्र.संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे,डे.डायरे